Share

चंद्र, मंगळ पिधान युती आज सायंकाळी पहायला मिळणार! एक अद्भुत खगोलीय घटना

Published On: 

औरंगाबाद : मराठी नववर्षाच्या सुरुवातीलाच पश्चिम आकाशात मंगळाच्या पिधान युतीची दुर्मिळ घटना आज (दि.१७) पाहण्याचा योग येणार आहे. एक अद्भुत, प्रेक्षणीय आणि खगोलीय घटना असणार असल्याची माहिती एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

शनिवारी सायंकाळी पश्चिम आकाशात आपल्या पृथ्वीचा ‘चंद्र’ आणि सूर्यमालेतील तांबडा असलेल्या ‘मंगळ’ ग्रहाची ‘पिधानयुती’ पहायला मिळणार आहे. आपल्याला ग्रहण म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण एवढेच माहीत असते. परंतु पिधानयुती हे देखील एक प्रकारचे ग्रहण आहे. ही पिधान युती अनेकदा होत असते परंतु आपल्या भागातून दिसण्याचा हा योग अनेक वर्षानंतर आला आहे.

यावेळी सूर्य मावळलेला नसल्याने ही घटना नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार नाही. तब्बल दोन तास मंगल ग्रह चंद्रबिंबाच्या मागे दडून राहील. यात निरीक्षकाच्या स्थळानुसार वेळेत थोडाफार बदल होईल. सध्या मंगळ ग्रह वृषभ राशीत असून पृथ्वीपासून खूप दूर आहे. त्यामुळे मंगळाचे बिंब खूप लहान दिसते. त्यामुळे ज्या भागात प्रकाशाचे प्रदूषण आहे अशा भागातून यासाठी दुर्बीण किंवा द्विनेत्री वापरावी लागणार आहे. तसेच त्याबाजूला आकाशात ढग असल्यासही पाहता येणार नाही. मात्र आकाश निरभ्र असेल तर कॅमेराने फोटोग्राफी करता येणार आहे. पिधान युतीची ही घटना आशिया खंडातील काही भागातच दिसणार आहे

या भागात दिसणार पिधानयुती

पिधानयुती ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारत, नेपाळ, तिबेट, बांगलादेश या भागातून पहायला मिळणार आहे. या वेळेस मंगल ग्रहाची तेजस्विता ही १.५ इतकी असणार आहे. या वेळी चंद्राच्या उत्तर दिशेला ब्रम्ह र्हदय हा तेजस्वी ताराही दिसणार आहे. या वेळेस चंद्र व मंगळ हे वृषभ राशीत असणार आहे. सायंकाळी सूर्य मावळत असताना चंद्राची पंचमीची कोर आकाशात दिसेल. मुंबई येथून पाहिले तर मंगळ ग्रह चंद्राच्या सावली कडील भागातून सायंकाळी ५ वाजून ३१ मिनिटाने चंद्राच्या पाठीमागे लपवण्यास सुरुवात करेल.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!