🕒 1 min read
मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी सरकारी कर्मचाऱ्यांची बाजू घेत राजस्थान,छत्तीसगढ राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे ट्वीट केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागणीचा मुद्दा समोर आला आहे.
दरम्यान शासकीय सेवेत २००५ पासून दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन (Pension) बंद करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना २००५ पूर्वी जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी केली आहे. आता यासंदर्भातच नाना पटोले यांचे ट्वीट चर्चेत आले आहे.
राजस्थान,छत्तीसगढ राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 14, 2022
दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना २००५ पूर्वी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी याआधी राज्यभर आंदोलनं केली आहेत. २००५ पासून दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे हजारो शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळणार नसल्याने वृद्धपकाळात संकटांना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून अनेक आंदोलने केली आहेत. आता नाना पटोले यांचे ट्वीट पुन्हा एकदा या प्रश्नांना समोर घेऊन आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“भारताच्या मिसाईचे उत्तर आम्ही पण देऊ शकलो असतो, पण आम्ही…” – इम्रान खान
-
“…हे देवेंद्र फडणवीस पंतप्रधान मोदींना मान्य आहे का?”, संजय राऊतांचा सवाल
-
“या” प्रसिद्ध अभिनेत्रीला पर्स चोरताना पकडले; पोलिसांकडून अटक
-
“आम्ही सरकारच्या दबावाला भीक घालत नाही”, प्रविण दरेकरांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
