Share

“गोव्यात कधीच पक्ष जिंकत नाही तर…”, संजय राऊतांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली: गोव्यात भाजपला मोठा विजय मिळाला आहे. गोव्यात पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांचे सरकार बनणार आहे. मात्र प्रमोद सावंत यांचे नेतृत्व विश्वजित राणे मान्य करत नाहीयेत, यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.

यावेळी संजय राऊत यांनी म्हटले की, ” गोव्याच्या निवडणुका एखाद्या पक्षाने जिंकल्या तर याचा कुणीही टेंभा मिरवू नये. गोव्याच्या निवडणुका कोणाच्याही हातात राहत नाहीत. आमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांचे गोव्याच्या निवडणुकीत फार मोठे योगदान आहे. म्हणून त्यांचे भाजपच्या कार्यालयात फार मोठे स्वागत करण्यात आले. विधानभवनात फडणवीस यांचे स्वागत झाले. आम्हाला आनंद झाला की, महाराष्ट्राचा नेता गोवा जिंकून आला. मात्र गोवा कुणालाही जिंकता येत नाही.”, असे म्हणत त्यांनी फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.

तसेच पुढे ते म्हणाले की, “गोव्याचे राजकारण फार विचित्र आहे. गोव्यात कधीच पक्ष जिंकत नाही. गोव्यात फक्त व्यक्ती जिंकते. आणि त्यातील काही व्यक्ती एकत्र येऊन सरकार बनवतात. पणजीमध्ये उत्पल पार्रीकर यांचा पराभव झाला. त्यांचा ज्यांनी पराभव केला ते बाबुश मोन्सेरात यांनी सांगिले की, माझ्या विजयामध्ये भाजपचा अजिबात सहभाग नाही. माझा मी जिंकलो. गोव्यात पक्षापेक्षा व्यक्तींना महत्व असते. असे काही व्यक्ती एकत्र येतात. आणि ते झुंड बनवतात.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!