🕒 1 min read
मुंबई: श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलने घोषणा केली होती की, भारताविरुद्ध सुरु असलेली मालिका ही त्याची शेवटची मालिका असेल आणि लवकरच तो निवृत्त होणार आहे. बेंगळुरू डे नाईट कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावाच्या समाप्तीनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक, राहुल द्रविड आणि विराट कोहली लकमलचे वैयक्तिकरित्या जाऊन कारकिर्दीबद्दल अभिनंदन करताना दिसले.
सुरंगा लकमलने (suranga lakmal) लंकन संघासाठी ६९ कसोटी सामने खेळले आणि १७० विकेट घेतल्या. तो लंकेच्या संघातील प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे आणि त्याच्या अनुपस्थितीमुळे गोलंदाजी आक्रमणात मोठी पोकळी निर्माण होईल. लकमलने भारताच्या पहिल्या डावात फक्त आठ षटके टाकली, जिथे त्याने रवींद्र जडेजाची विकेट घेतली. दुसऱ्या डावात त्याने दहा षटके टाकली आणि एकही विकेट न घेता ३४ धावा दिल्या. डावाच्या समाप्तीनंतर, द्रविड (rahul dravid) आणि विराट (virat kohli) लकमलच्या ड्रेसिंग रूम परत येण्याची वाट पाहत होते , आणि त्यांनी नंतर लकमलचे अभिनंदन केले.
https://twitter.com/addicric/status/1503032350023696385?s=20&t=STj812ria-DeVhTyAD_MOQ
सकाळच्या सत्रात लंकन संघाला १०९ धावांत गुंडाळल्यानंतर, भारताने पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी केली. सरतेशेवटी, त्यांनी ३०३-९ वर डाव घोषित केला आणि लंकेसाठी ४४७ धावांचे लक्ष्य ठेवले. या धावांचा पाठलाग करताना लंकेचा संघ २८-१ बाद आहे.
महत्वाच्या बातम्या
- “या” प्रसिद्ध अभिनेत्रीला पर्स चोरताना पकडले; पोलिसांकडून अटक
- “आम्ही सरकारच्या दबावाला भीक घालत नाही”, प्रविण दरेकरांचा हल्लाबोल
- बारावीचा केमिस्ट्री विषयाचा पेपर फुटलाच नाही; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण
- IPL 2022: नेट सेशन मध्ये धोनीची धमाकेदार फटकेबाजी; चाहत्यांना आठवला ‘विंटेज माही’
- पुण्यातील नदी सुधार योजनेला ठाकरे सरकारकडून ब्रेक!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
