Share

मायच्यान कोणाचाही नाद करा, पण पवार साहेबांचा नाद करु नका – धनंजय मुंडे

Published On: 

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक १७ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.

निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली असून विविध नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे देखील आज या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात दाखल झाले आहेत. एकामागे एक नेते या निवडणुकांसाठी दाखल होत असल्याने सबंध महाराष्ट्राच्या नजरा या निवडणुकांकडे लागल्या आहेत.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांसह नेत्यांच्या भाषणांमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला गेला असतानाच आज धनंजय मुंडे यांनी प्रचारसभा घेत भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘मायच्यान कोणाचाही नाद करा, पण पवार साहेबांचा नाद करु नका’ असा इशाराच त्यांनी विरोधी नेत्यांना दिला आहे.

‘आजचा दिवस माझ्या आयुष्यात का यावा? पंढरपूरच्या पांडुरंगाला मी प्रश्न विचारतो. माझ्या जीवनातील सर्वात मोठी सभा नानांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळीच मी संगितलं होतं, नाना हॅट्रिक करणार ते. नानांचं आणि माझं नातं हे वडील-मुलाचं होतं. मी आशीर्वाद द्यायला नाही. तर भगीरथसाठी आशीर्वाद मागायला आलो आहे.’ अशी सुरुवात करताच मुंडेंच्या भाषणाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.

‘वारकरी संप्रदायात या गावाचं वेगळं स्थान आहे. त्यामुळे १७ तारखेला वळवळ करणाऱ्याला चांगलं रिंगण दाखवायचं आहे. मी कच्च्या गुरुचा चेला नाही. मी कासेगावच्या सभेत सांगितले होते, मायच्यान कोणाचाही नाद करा, पण पवार साहेबांचा नाद करु नका. पण नाद केल्याशिवाय त्यांना रहावत नाही. टिका करायचे विरोधकांचे काम आहे. लोकशाहीचा आदर करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. ते आम्हालाच लोकशाही शिकवतायत. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं पवार साहेबांनी करुन दाखवलं आहे.’ असं म्हणत धनंजय मुंडेंनी भाजपला सत्तास्थापने वेळी झालेल्या घटनाक्रमाची आठवण करून दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!