मुंबई : भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रावर शिंतोडे उडवण्याचे काम केले आहे. मात्र, आमचा महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. मात्र, प्रकाश जावडेकर सारखे भाजप नेते महाराष्ट्रात राहतात, हेच आमचे दुर्देव असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केली आहे.
प्रकाश जावडेकर महाविकास आघाडीला जनतेने निवडून दिलेले नसल्याचे सांगत आहे. मात्र, देशातील सहा राज्यात काँग्रेस पक्षाने बहुमत मिळवल्यानंतरही भाजपने सत्ता हस्तगत केली. ती सर्व राज्ये पैसे आणि दबावाच्या माध्यमातून भाजपने ताब्यात घेतली आहे. त्यामुळे त्यांना आमच्या बद्दल बोलण्याचा अधिकार नसल्याची टीकाही डॉ. वाघमारे यांनी केली आहे. पंतप्रधान केअर फंडात निधी द्या आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या फंडात निधी देवू नका, असे भाजपचे नेते सांगत होते. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला असल्याचेही ते म्हणाले.
भाजपच्या नेत्यांचा महाराष्ट्राची बदनामी करण्याचा डाव पुराव्यानिशी उधळून लावून बोलती बंद केली-डॉ राजू वाघमारे नेता प्रवक्ता काँग्रेस @BJP4Maharashtra @CMOMaharashtra @NANA_PATOLE @INCMaharashtra @TV9Marathi @INCMumbai @BhaiJagtap1 @Charanssapra @bbcnewsmarathi @MiLOKMAT @ani pic.twitter.com/uMedV4adGV
— Dr. Raju waghmare (@drrajuwaghmare) April 13, 2021
भाजपचे नेते एक बोट आमच्याकडे दाखवत असतील तर त्यांच्याकडे चार बोटे असतात. खोटे बोलणाऱ्या भाजप नेत्यांनी आधी स्वत: मध्ये झाकले पाहिजे. ज्या मराठी मातीने तुम्हाला मोठे केले, त्याच महाराष्ट्राला बदनाम हे नेते करत असल्याचा आरोपही या वेळी डॉ. वाघमारे यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दलित भिकारी नाहीत तर शिकारी आहेत : रामदास आठवले
- कुंभमेळ्यातील गर्दीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले..
- लॉकडाउनबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आजच घेणार, मुंबईच्या पालकमंत्र्यांनी दिले संकेत
- बोगस डॉक्टरने सुरु केले होते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पुण्यातील धक्कादायक प्रकार
- उद्धव काका घरी किराणा पाठवणार आहेत का? डीमार्ट बंद झाल्याने तरुणीचा संतप्त सवाल


