अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- देशातील कांद्याचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. केंद्राच्या या अनपेक्षित निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कांदा निर्यातीवर केंद्राने बंदी घातल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्यायकारक असून तो शेतकरी हिताचा नसल्याने, कांदा निर्यात बंदी लवकरात लवकर हटविण्याची मागणी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आ.लंके यांनी निवेदनात म्हटले आहे की, मार्चपासून शेतकरी कोरोनाच्या संकटात सापडलेला असल्याने केंद्र सरकारने पुन्हा शेतकऱ्यांना संकटात टाकू नये. कांद्यावरील निर्यात बंदी लवकरात लवकर मागे घ्यावी. तसेच कोरोना संकटाच्या काळात निर्यात बंदी म्हणजे कोरोना पेक्षाही मोठे संकट असल्याचे सांगत वेळप्रसंगी कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सरकारने हा निर्णय रद्द करण्याची मागणीही निवेदनात लंके यांनी केली आहे.
केंद्राच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होतील. कांद्याचे भाव कोसळतात त्यावेळी केंद्र सरकार कधी अनुदान देते का? केंद्र सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड नाराज झाला आहे. केंद्राने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आ.लंके यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- मुस्लिम समाजाला तातडीने आरक्षण द्या!
- कांदा प्रश्न पेटला, सुभाष भामरे पियुष गोयल यांच्या भेटीला !
- ‘उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराजांचा जयजयकार करतात तर महाराष्ट्राचे सत्ताधारी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागतात’
- योगी आदित्यनाथांचा निर्णय अभिमानास्पद- खा. उदयनराजे भोसले
- राज्यात सप्टेंबर अखेर शाळा सुरू होणे अवघडच; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

