Share

मुस्लिम समाजाला तातडीने आरक्षण द्या!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाची राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती अतिमागास झालेली असल्याने मुस्लिम समाजास तातडीने आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत पाथर्डी तालुका सकल मुस्लिम समाजाच्या वतीने नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील मुस्लिम समाज सर्व स्तरांवर अतिशय मागास झाला आहे. सच्चर समिती, मोहम्मदूर रहमान समिती आणि रंगनाथ मिश्रा आयोग यांनी सखोल अभ्यास करून आपापल्या अहवालात मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण मिळावे अशी शिफारस केली आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची कायदेशीर बाजू संविधानानुसार भक्कम आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर कायदा करून मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे.

तसेच आघाडी सरकारने मुस्लिम आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात मुस्लिम आरक्षण कायदेशीर व घटनात्मक रित्या द्यावे, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष नासिर शेख, लाला शेख, रफिक शेख, परवाज पठाण, अक्रम आत्तार, जुनेद पठाण, हारूण मणियार, अमजद आत्तार, आरिफ जहागीरदार, इरफान खान, असलम सय्यद, सिकंदर शेख, अमीर पठाण आदींसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!