Share

योगी आदित्यनाथांचा निर्णय अभिमानास्पद- खा. उदयनराजे भोसले

Published On: 

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला तो आग्य्रातल्या औरंगजेबाच्या दरबारातून. महाराजांनी याच दरबारातल्या अपमानाचा बदला घेवून अखंड हिंदुस्तानावर राज्य केलं. असं म्हणत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करुन आभार मानले आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. योगींनी आग्रातील मुघल संग्रहालयाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज’ संग्रहालय असे केले आहेत म्हणून आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर त्यांच स्वागत करत आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्र्यातील मुघल संग्रहालयाचे नामकरण करून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असे केले आहे. जेव्हा पासून योगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यापासून ते वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणांचे नावं बदलत आहे. मुघलांची ओळख आम्हाला नकोय आणि आम्हाला आमच्या संस्कृतीवर गौरव आहे, असं योगींनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांंचा अपमान करून त्यांना कैद केले होते त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफीने ‘आग्र्याहून सुटका’ करून घेतली होती.आता या नामकरणामुळे महाराष्ट्रात आनंद व्यक्त केला जात आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या संस्कृतीच्या उत्थानासाठी अनेक पाऊले उचलली आहेत. बहुमताने भाजप सरकार आल्यानंतर त्यांनी राज्यात मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या अशा कारभारावर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव,माजी मुख्यमंत्री मायावती यांनी नेहमीच विरोध केला आहे. त्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री योगींनी अनेक स्थानांचे नामकरण केले आहेत.
दरम्यान याआधी त्यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नामकरण ‘अयोध्या’ असं केलं होतं. मुघलसराय जंक्शनचे नामकरण ‘पंडित दिनदयाल उपाध्याय जंक्शन’ तर अलाहाबाद शहारचं नाव ‘प्रयागराज’ असं केलेलं आहे. आता अलिगढ जिल्ह्याचे नावसुद्धा बदलावं अशी मागणी होत आहेत. आता त्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!