Share

कांदा प्रश्न पेटला, सुभाष भामरे पियुष गोयल यांच्या भेटीला !

Published On: 

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी लादली. वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. संबंधित निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली. या निर्णयावर शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. बंगळुरू रोझ व कृष्णापुरम या जाती वगळून सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनायाने बंदी घातली आहे. कांदा पावडरला या निर्यातबंदीतून वगळण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाला असून केंद्राने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. तर शेतकऱ्यांचं मरण हेच मोदी सरकारच धोरण आहे का असा सवाल देखील आता उपस्थित होत आहे. काल कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी धुळ्याचे खासदार व माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष रामराव भामरे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेत यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली.

यासंदर्भात भामरेंनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहिले असून कांद्याचे भाव कोसळत असल्याने उत्तर महाराष्ट्र भागातील कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत.त्यामुळे निर्यातबंदी च्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा व निर्यातबंदी उठवावी अशी मागणी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केली आहे.

दरम्यान, राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनीही कांदा निर्यात बंदीला विरोध केला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेली बंदी ही शेतकऱ्यांच्या हिताची नसल्याचं सांगत हा निर्णय केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावा असे मत राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केलय. त्यामुळे आता पुन्हा एकदा कांदा प्रश्नावरून केंद्र आणि राज्य सरकार मध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आता कुठे सुगीचे दिवस येत असताना केंद्राने ही निर्यातीवर घातलेली बंदी चुकीची असल्याचं भुसे म्हणाले . ते आज पालघर दौऱ्यावर आले असता बोलत होते. मात्र कांदा हा इतकाही जीवनावश्यक नसून ज्याला जस पटेल तसं तो घेईल अस ही भुसे या वेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!