औरंगाबाद : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या पती रामदास साळवे ४६, रा.राजीव नगर झोपडपट्टी, रेल्वेस्टेशन याला जन्मठेप आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एस.देशपांडे यांनी गुरवारी दि.२० दिले. विशेष म्हणजे मयताच्या दोन्ही अल्पवयीन मुलांच्या पुर्नवसनाबाबत निर्णय घेण्यासाठी व नुकसान भरपाई बाबत प्रकरण जिल्हा विधी प्राधीकरणाकडे पाठविण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत.
मयम ज्योती २५ यांची बहिण आशाबाई दिलीप धनराज ३० यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनूसार, घटनेच्या तीन वर्षांपूर्वी ज्योतीचे लग्न आरोपी रामदास साळवे याच्याशी झाले होते. रामदास पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी मारहाण करीत होता. घटनेच्या ५ महिन्यापूर्वी रामदास त्याच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी अश्विनी १२ हिला सोबत घेऊन रेल्वे स्थानकालगतच्या राजीवनगर झोपडपट्टी येथे राहण्यास गेला होता. तर ज्योती तिचा मुलगा आदित्य दीड वर्ष याच्यासोबत अब्रार कॉलनी येथे राहत होती.
१५ नोव्हेंबर २०१४ रोजी सकाळी रामदास त्याची पत्नी ज्योती हिला घेऊन राजीवनगर येथे गेला होता. त्याच दिवशी सायंकाळी रामदास ज्योतीचा भाऊ सुनील जगताप यांच्या घरी गेला होता. ज्योती लघवीचा बाहणाकरून निघून गेली आहे. त्ाुमच्याकडे अली का अशी चौकशी केली होती. दुसऱ्या दिवशी सासू सासऱ्याच्या घरून रामदास मुलगा आदित्य याला घेऊन गेला होता. त्यानंतर बहीण भावंडांनी शोध घेतला असता राजीवनगर येथील रामदासाच्या खोलीत ज्योती बेशुद्धावस्थेत जमिनीवर पडलेली व तिच्या नाका तोंडातून रक्त आलेले आणि तिचा गळा दाबल्याच्या खुणा दिसल्या होत्या. पोलिसांनी ज्योतीला घाटी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता राजू पहाडिया यांनी १५ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यापैकी ज्योतीचा भाऊ सुनील जगताप आणि डॉक्टर यांचे जबाब महत्वाचे ठरले. सुनावनीअंती न्यायालयाने आरोपी रामदासला जन्मठेप आणि तीन हजारांचा दंड ठोठावला.
महत्वाच्या बातम्या
- ‘फोटोसेशन नव्हे तर मदतीसाठी आलोय’, रत्नागिरी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
- ‘..म्हणून झक मारत मुख्यमंत्री ठाकरेंना कोकणात यावे लागले’, निलेश राणेंची जहरी टीका
- ‘भारत जागतिक अर्थव्यवस्थेला बळकटी देऊ शकतो’, परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांचे मत
- कोरोना आटोक्यात कसा येणार? देशातील निम्मे लोक मास्कच वापरत नाहीत
- पंतप्रधान मोदींकडून हिवरेबाजारच्या कोरोना प्रतिबंधक कामांची दखल

