Share

कोरोना आटोक्यात कसा येणार? देशातील निम्मे लोक मास्कच वापरत नाहीत

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. पण तरी देखील लोकांना गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सध्या तरी नियमित मास्क वापरण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. परंतु देशातील ५० टक्के लोक अजूनही मास्क वापरत नाहीत, अशी माहिती सरकारने दिली.

विशेष म्हणजे मास्क वापरणाऱ्यांपैकी ६४ टक्के लोक मुखपट्टीचा वापर केवळ तोंड झाकण्यासाठी करतात. मास्क लावून देखील या लोकांचे नाक उघडेच असते, असे एका सर्वेक्षणातून समोर आल्याचे आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी सांगितले. या सर्वेक्षणानुसार मास्क वापरणाऱ्या ६४ टक्के लोकांपैकी २० टक्के लोकांचा मास्क हनुवटीवर तर २ टक्के लोकांचा मास्क गळ्यावर असतो. आरोग्य मंत्रालयाच्या दैनंदिन पत्रकार परिषदेत ते गुरुवारी बोलत होते.

गेल्या दोन दिवसांपासून देशात दररोज २० लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात येत असून, जून अखेरपर्यंत दैनंदिन चाचणी संख्या ४५ लाखांपर्यंत होईल, असे भार्गव यांनी सांगितले. सरकारी आकडेवारीनुसार सलग १० आठवडे कोरोना संसर्गाचा दर वाढता होता. गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णसंख्या घटत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!