Share

पंतप्रधान मोदींकडून हिवरेबाजारच्या कोरोना प्रतिबंधक कामांची दखल

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : कोरोना आपत्तीला तोंड देण्यासाठी आखलेल्या धोरणासंबंधी विचार करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या संवादाच्या मालिकेत गुरुवारी १० राज्यांतील ५४ जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोरोना प्रतिबंधासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली.

अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजारने गावात आरोग्य व स्वयंसेवकांची ४ पथके स्थापन करून गावातील प्रत्येक घराचा सर्व्हे केला. कोरोना लक्षणे आढळणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या घराची आणि कुटुंबाची जबाबदारी या पथकाने घेऊन रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल होण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे रुग्णांची आता आपल्या घराचे आणि कुटुंबाचे काय होणार, शेतीभाती आणि दूधदुभत्याच्या कामाचे काय होणार याबाबतची काळजी मिटली.

ज्यांचा सुरुवातीला विलगीकरणात जाऊन उपचाराला विरोध होता ते या प्रयत्नामुळे विलगीकरणात राहून उपचार घेण्यास तयार झाले. यातूनच कोरोनामुक्त हिवरेबाजारची वाटचाल सोपी होऊन गाव सुरक्षित झाल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली व हिवरेबाजारचा हा कोरोनामुक्तीचा पॅटर्न पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १३१६ ग्रामपंचायतींमध्ये राबवला जात असल्याचे सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!