Share

कामे सुरु करण्यासाठी संघर्ष समितीचे पत्र अभियान

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औट्रमघाटाचे तसेच बोगद्याचे काम लवकरात लवकर सुरु कारावे तसेच नागरी सुविधा पूर्ण झाल्यानंतर सुरक्षितता प्रमाणपत्र मिळाल्यानंवर टोल सुरू करण्या यावे या मागणीसाठी कन्नड तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, नागरिकांनी एक लाख पत्र पाठविण्याचे आवाहन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

कन्नड व खुलताबाद तालुक्यातील सर्व सरपंच/उपसरपंच व नागरिकांना आवाहन करण्यात येते की नॅशनल हायवे – 52 धुळे – सोलापुर महामार्गावरील कन्नड घाटातील (औट्रमघाट) बोगद्या (टनेल) सद्यस्थितीत प्राधिकरणाने थांबवले असून 5500 कोटीच्या बोगदे ऐवजी पर्यायी मार्गाचा विचार सुरू आहे.मुळात बोगद्या च्या अंतिम DPR मंजुरीनंतर घाटातील दगडाची तांत्रिक तपासणी केल्यानंतर बोगदा होण्यास अडचण नाही या अभिप्राया नंतर 8 ते 10 वर्षांपूर्वी सोलापूर ते औट्रम घाटा पर्यंत काम सुरू करण्यात आले तर चाळीसगाव ते धुळे या कामाची निविदा अंतिम टप्प्यात आहे.

आज घडीला टनेल चे काम विनाविलंब सुरू झाले पाहिजे टनेल झाला तरच भविष्यात रेल्वे होऊ शकते तसेच राज्यमार्ग 39 गल्लेबोरगाव ते देवगाव,राज्यमार्ग 52 कन्नड वैजापूर,जिल्हा मार्ग गल्लेबोरगाव ते टाकळी चापानेर.कन्नड ते अंधानेर ,जेऊर नांदगाव या प्रमुख मार्गावरून राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच या क्रॉसींग ठिकाणावर रोज अपघात होत असून अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.तर अनेक प्रवाशांना अपघातात अपंगत्व आलेले आहे.यासाठी या अपघात स्थळावर उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग बनवावे तसेच तेलवाडी ते कसाबखेडा फाट्यापर्यंत सर्विस रोड बनवावे जेणेकरून सर्विस रोड वरून ग्रामस्थ,शेतकरी आपले ट्रकटर,बैलगाडी,मोटारसायकल चे दैनंदिन व्यवहार करू शकतात.

जोपर्यंत नागरी सुविधा पूर्ण होत नाही व अपघात पूर्ण पणे बंद होत नाही तोपर्यंत टोल नाका सुरू करू नये. तसेच नागरी सुविधा पूर्ण झाल्यानंतर सुरक्षितता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर टोल सुरू करण्यास हरकत नाही.मात्र स्थानिक नागरिकांना पंचवीस किलोमीटर पर्यंत हवाई अंतरानुसार टोल मधून सूट द्यावी.

या व मागणीसाठी आपण एक लक्ष नागरिकांच्या स्वाक्षरी चे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे ,केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री मा.नितींजी गडकरी , रेल्वेमंत्री मा.पियुषजी गोयल ,उद्योगमंत्री तथा पालकमंत्री मा.सुभाषजी देसाई त्यांना देणार आहोत यासाठी आपण सर्वांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेऊन ही मोहीम येत्या 4 दिवसात अंतिम व यशस्वी करावी असे आवहन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!