मुंबई : सांस्कृतिक क्षेत्रातील शिखर अकादमी म्हणून कार्यरत असणाऱ्या पु.ल.देशपांडे अकादमीचा कायापालट होणे आवश्यक असल्याने येणाऱ्या काळात यावर भर देण्यात यावा, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. पु.ल.देशपांडे अकादमीला स्वायत्ता देण्यासंदर्भातील बैठक मंत्रालयात देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, उपसचिव शैलेश जाधव, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. देशमुख म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या कला परंपरेचे जतन करण्याचे काम या अकादमीच्या माध्यमातून होत असते. तर राज्यातील विविध कला क्षेत्रातील कलावंतांच्या कला गुणांना वाव देऊन त्यांना समृध्द करण्यात अकादमीचा मोठा वाटा आहे. या अकादमीमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांची कलेविषयी अभिरुची समृध्द करण्यासाठी अकादमीने यापुढील काळात काम करणे आवश्यक आहे.’
आजच्या काळाशी सांगड घालून येणाऱ्या काळात या अकादमीचा कायापालट करता येईल याबाबत अभ्यास करण्यात यावा. तसेच सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरील काम करणाऱ्या तज्ञ सल्लागार नेमून हे काम कशा पध्दतीने करता येईल याबाबतही माहिती घेण्यात यावी.
महत्त्वाच्या बातम्या
- तुटपुंजी मदत नको, मराठवाड्यासाठी विशेष पॅकेज द्या; कराडांची राज्य सरकारकडे मागणी
- वडिलोपार्जित पतौडी राजवाड्यातील उत्पन्नाबाबत सैफने केला खुलासा..!
- नवाब मलिकांच्या आरोपांवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण, म्हणाले..
- औरंगाबादेत पुन्हा बरसला जोरदार पाऊस, झाडे कोसळून वाहने चकनाचूर!
- दोन दिवसांच्या अंधारानंतर लातूरमधील ‘त्या’ गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

