🕒 1 min read
मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. मात्र यावरच यंदाच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी काहीच नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut)यांनी दिली आहे.
“मोदी सरकारचे बजेट नेहमीच आभासी आणि फसवे असते. (Modi government budget is always virtual and fraudulent)त्यांच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी काहीच नसते. आणि यंदाही असेच झाले आहे. यंदाच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी काहीच नाही. गरिबांचा गळा किती आवळतात आणि देशातील दोनचार श्रीमंत आणखी किती श्रीमंत होत जातात ते, येत्या काळात पाहूच”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी टीकेची झोड उठवली असतानाच दुसरीकडे भाजप नेत्यांनी भारताला आत्मनिर्भरतेकडे आणि अधिक बलशाली करणारा अर्थसंकल्प असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते अतुल भातखळकर अशा नेत्यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “दुसरा कपिल देव शोधणे बंद करा”, गंभीरचा भारतीय संघाला सल्ला
- “गुलाबी स्वप्नांशिवाय सर्वसामान्यांना काहीही मिळाले नाही”, अर्थसंकल्पावर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया
- ‘हे निवडणुकीचं बजेट’; आदित्य ठाकरेंची टीका
- नितेश राणेंना मोठा धक्का; सिंधुदुर्ग न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
- “माझं कुठलं पात्र तुम्हाला आवडतं?”, दीपिका पादुकोणच्या प्रश्नावर पती रणवीर उत्तरला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
