औरंगाबाद : सध्या दररोज दिड हजारांवर रुग्ण संख्या निघत आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी नियमांना धाब्यावर बसवण्यासारखे प्रकार समोर येत आहेत. नागरिकांनी आरोग्याप्रति जागरूक राहावे, नियमांचे पालन करावे यासाठी आरोग्य विषयक विविध प्रकारच्या म्हणी, पोस्टरच्या माध्यमातून पडेगाव येथील माजी सैनिक गजानन काळे शहरात जनजागृती करत आहेत. ठेवुया १ मीटर अंतर- करूया कोरोना छूमंतर म्हणत काळे शहरातील विविध भागात फिरत आहेत.
खांद्यावर तिरंगा घेऊन सशक्त भारत, निरोगी समाज हा संकल्प ठेवुन त्यांनी नागरिकांशी सवांद साधला. हातात तिरंगा व वेगवेगळ्या आरोग्य संदेशाचे पोस्टर नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यात ठेवुया १ मीटर अंतर- करूया कोरोना छू मंतर, स्वच्छ करू या हात- करूया कोरोना वर मात, रोज एक फळ खाऊ या- आरोग्याचे सवंर्धन करू या, पोषक आहार घेऊया- निरोगी राहु या, प्रशासनाला मदत करू या- कोरोनाला हरवु या, साफ सफाई करू या- बिमारीला हरवु या अशा विविध प्रकारचे आरोग्य संदेश देऊन जनजागृती केली.
पोस्टर बनविण्यासाठी इयत्ता ५ वी मध्ये असलेला अनुराग काळे व ८ वी शिकत असलेल्या गायत्री काळे या त्यांच्या मुलांनी त्यांना मदत केली. जनजागृतीचा हा विचार कसा सुचला याविषयी ते म्हणाले सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारी दरम्यान अनेक ठिकाणी नागरिक नियम पाळत नसल्याचे, मास्क घालत नसल्याचे दिसून आले. त्यामुळेच हा उपक्रम राबवल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने विविध सामाजिक, आरोग्याशी निगडीत बाबींवर त्यांनी प्रकाश टाकत जनजागृती केली आहे. या सर्वांमुळे जर नागरिकांना नियमांचे, आरोग्याचे महत्त्व कळत असेल तर यातच आपल्या कामाचे समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ वॉर्डात मिळतोय लसीकरणाला कमी प्रतिसाद, त्यामुळे केंद्रे इतरत्र हलवणार!
- पोलिसांनी मारलं तर सोडू नका,मी तर सोडणार नाही; उदयनराजेंचं धक्कादायक विधान
- आजोबा चढले बोहल्यावर! बीडच्या ‘प्रतिष्ठित’ व्यक्तीला दुसऱ्या बायकोने लावला चुना
- मी काय फार मोठा माणूस नाही, लसीकरणावरून होणारे राजकारण थांबवा; राजेश टोपे हळहळले
- छगन भुजबळांच्या ‘त्या’ वक्तव्याचा प्रवीण दरेकरांनी केला निषेध


