Share

छगन भुजबळांच्या ‘त्या’ वक्तव्याचा प्रवीण दरेकरांनी केला निषेध

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांची अवस्था अत्यंत वाईट असून, योग्य उपचाराअभावी बहुतांश रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. तर आज नाशिक मध्ये नागरिकांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत नसल्यामुळे रस्त्यावर उतरून आंदोलन देखील केले.

रेमडेसिव्हिर इंजेक्शनची उपलब्धता नसल्याने गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्य सरकार उपलब्धतेचे कितीही दावे करीत असले, तरी रुग्णालयाकडून मात्र टंचाईचे कारण सांगितले जात आहे. तर काही ठिकाणी रेमडेसिव्हिर इंजेक्शनाचा काळा बाजार चालू असून अनेकांना दुर्दैवाने चढ्या भावाने रेमडेसिव्हिर इंजेक्शन खरेदी करावे लागत आहे.

अशातच आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यावर धक्कादायक विधान केले आहे. रेमडेसिव्हिर लस काय आमच्या घरी तयार होत नाही, असे वक्तव्य त्यांनी केल्यामुळे जनेतेमध्ये आता याचा संताप व्यक्त केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर आता भुजबळांच्या या वक्तव्याचा चांगलाच संचार घेतलेला पाहायला मिळत आहे. ‘छगन भुजबळ यांनी रेमडीसीवर आमच्या घरात तयार होत नाही असे म्हणणे म्हणजे सरकार या व्यवस्थेत हतबल असल्याचा एकाअर्थी पुरावाच आहे. अशा प्रकारची वक्तव्ये करणं म्हणजे सरकारने आपल्या कर्तव्यापासून आणि जबाबदारीपासून दूर जाणं असं होतं. छगन भुजबळ हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी असे वक्तव्य करणं योग्य नाही. जेव्हा आपातकालीन स्थिती असते, तेव्हा राज्याची जनता घाबरलेली असते. त्या जनतेला समजावून सांगणं आणि त्यांच्या रोषाला शांतपणे सामोरं जाणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. त्यामुळे भुजबळांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो’, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!