सातारा – राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सरकारने काही कडक निर्बंध लावले आहेत. मात्र, सर्वसामान्य नागरिकांपासून ते व्यापारी आणि भाजपने देखील वारंवार सरकारच्या लॉकडाऊनच्या भूमिनेकवर विरोध दर्शवला होता. आता यात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही उडी घेतली आहे.
राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास लोकं आणि मी ऐकणार नाही. उद्यापासून लॉकडाऊन उठला पाहिजे. त्यानंतरही शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास तो आम्हाला मान्य नाही. यावरून मारामारी किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण त्यासाठी सरकार जबाबदार असेल. लोकं पोलिसांना चोपून काढतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
भोसले म्हणाले,कोरोनाचे कारण पुढे करून शासन वारंवार गोरगरिबांच्या पोटावर पाय आणत आहे. ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमी होते, असे लोक मरण पावतात. मात्र, भुकेपोटी मरणाचे प्रमाणदेखील वाढणार आहे, हे शासनाने लक्षात घ्यावे. लोक संतप्त आहेत, आता भुकेने व्याकूळदेखील होऊ लागले आहेत. त्यामुळे भुकेच्या त्रासापायी लोक पोलिसांवरदेखील हात उचलायला आता कमी पडणार नाहीत, असेदेखील त्यांनी ठणकावले.
एका पोलिस अधिकाऱ्याच्या प्रकरणात एवढे पैसे खाता, लोकांनीही विचार केला पाहिजे.कुठलेही कारण झाले की, लॉकडाऊन काय तुमच्या बापाचं राज्य आहे का? राजेशाही असती तर या सगळ्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं असतं, असा इशारादेखील उदयनराजे यांनी दिला. जोपर्यंत वैद्यकीय तज्ञ किंवा शास्त्रज्ञ लॉकडाऊनची गरज आहेच, असा अहवाल देत नाहीत, तोपर्यंत आम्ही लॉकडाऊन लागू देणार नाही, असेही उदयनराजे म्हणाले.
सगळं बंद करून टाकलं आहे. उपासमारीची वेळ आली आहे. कशाकरिता ? यांच्या बापाची इस्टेट आहे होय ? मी परखडपणे बोलतो कारण माझा जीव तुटतो.देवाशप्पथ सांगतो जर एका पोलिसांनी जर कोणाला काठी मारली तर संपूर्ण महाराष्ट्रात लॉ एंड ऑर्डरची परिस्थिती निर्माण होईल. सरळ मी तुम्हाला सांगतो कुणाला घाबरू नका. पोलिसांचा आपण आदर करतो म्हणून काय त्यांनी काहीही करावं… त्यांची ताकत काही नाही ये झिरो आहे झिरो. मानला तर देव नाहीतर दगड.
हजार लोकांनी एका पोलिसाला धरलं आणि चोपलं तर त्याची हाडं तरी दिसतील का? कृपया तसं काही करू नका.पण पोलिसांनी मारलं तर सोडू नका मी तर सोडणार नाही, असंही खासदार उदयनराजे म्हणाले. सणासुदीचे दिवस आलेत. कामगार लोक आहेत, व्यापारांनी कर्ज काढलं आहे. बँकानी त्यांच्यासमोर पैशासाठी तगादा लावलाय आणि लॉकडाउनमुळं तुम्ही त्यांना भीकेला लावणार का? असा सवाल उदयनराजेंनी सरकारला केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सामान्य जनतेसाठी कायम कार्यरत असलेला एक समर्पित लोकप्रतिनिधी हरपला’
- आम्ही आतंकवादी नाही, आमचा हक्क मागायला आलोय – निलेश राणे
- रेमडेसिव्हिर इंजेक्शन काय आमच्या घरी तयार होत नाही : छगन भुजबळ
- हर्षल पटेलची कमाल कामगिरी ; रोहित शर्माचा 12 वर्षाचा रेकॉर्ड मोडीत
- मोठी बातमी : राज ठाकरे अॅडमिट असल्याने आजच्या सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

