औरंगाबाद : वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने ११५ वॉर्डात जम्बो लसीकरण मोहिम सुरू केली आहे. तसेच लसीकरणाला सर्वत्र चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र प्रभाग क्रमांक एक, दोन आणि तीन मधील काही वॉर्डात खूपच कमी प्रतिसाद मिळत असलयाने या भागातील लसीकरण सेंटर्स इतरत्र हलवण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
मागील महिनाभरापासून शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढतच चालला आहे. वाढत्या रुग्णांच्या उपचारासाठी १४ कोविड केअर सेंटर पालिकेने सुरू केले आहे. त्यासोबतच लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेशन केले जात आहे. त्यामुळे कोविड सेंटर मधील बेड रिकामे राहत आहेत. दरम्यान, कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून शहरातील ११५ वॉर्डात ११५ सेंटर सुरू करुन जम्बो लसीकरण मोहीम राबवली जात आहे.
५ एप्रिलपासून सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मागील चार दिवसात १८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. प्रभाग क्रमांक चार ते नऊ मधील नागरिकांकडून लस घेण्यासाठी सेंटर्सवर गर्दी होत आहे. मात्र प्रभाग क्रमांक एक, दोन, तीन मधील काही वॉर्डातील नागरिकांकडून लसीकरणाला प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे.
पहिल्या दिवसापासून या ठिकाणी लस घेण्यासाठी नागरिक येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या प्रभागांमधील प्रतिसाद मिळत नसलेले सेंटर्स इतरत्र हलवण्याचे पालिकेने ठरवले आहे. पदमपूरा भागातील संत तुकाराम हॉस्टेलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केलेे होते. त्यानंतर हे कोविड सेंटर बंद करुन त्या ठिकाणी लसीकरण सेंटर सुरू करण्यात आले.
मात्र या सेंटरवर नागरिक लस घेण्यासाठी येत नसल्यामुळे हे लसीकरण सेंटर सुरेवाडीत हलवले आहे. तसेच कैलासनगर-अजबनगर हा वॉर्ड मोठा असल्यामुळे कैलासनगर मधील अमर प्राथमिक शाळेत लसीकरण सेंटर सुरू केले. या सेंटरवर नागरिक येत नसल्यामुळे हे सेंटर अजब नगरमध्ये स्थलांतरीत केले आहे.
चार दिवसांत १८ हजार डोस
जम्बो लसीकरण मोहिमेला सर्वच भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील चार दिवसात १८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र प्रभाग क्रमांक एक, दोन, तीन मधील काही वॉर्डातील लसीकरण सेंटरवर नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे काही सेंटर इतरत्र हलवण्याचे ठरवले आहे, असे पालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- मी काय फार मोठा माणूस नाही, लसीकरणावरून होणारे राजकारण थांबवा; राजेश टोपे हळहळले
- छगन भुजबळांच्या ‘त्या’ वक्तव्याचा प्रवीण दरेकरांनी केला निषेध
- रेल्वेस्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ!
- मोठी बातमी : राज ठाकरे अॅडमिट असल्याने आजच्या सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर
- नाभिक समाजाकडून ठाकरे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

