Share

चला कामाला! औरंगाबाद सोमवारपासून अनलॉक होणार; मॉल्स, सिनेमागृहे, विवाह सोहळ्यांना संपूर्ण परवानगी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचे नियम आता शिथिल होणार आहेत. महाराष्ट्रात पाच टप्प्यात अनलॉक प्रक्रिया असणार आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेड पेशंटच्या संख्येनुसार कोणता जिल्हा कोणत्या टप्प्यात असणार आहे हे ठरवण्यात येईल. याबाबतचे नवी नियमावली मध्यरात्री जारी करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार पाच टप्पे सध्या ठऱवण्यात आले आहेत. पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची संख्या या दोन निकषांनुसार अनलॉक प्रक्रिया कशी असणार आहे हे राज्य सरकारने सांगितलं आहे. मात्र, प्रत्येक आठवड्यात या दोन निकषांच्या आधारे जिल्ह्यांची वर्गवारी करून निर्बंध शिथिल करण्याचा किंवा ते कडक कऱण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासन काढणार आहे.

पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के आणि 25 टक्क्यांहून कमी ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ हे जिल्हे पहिल्या टप्प्यात येतील. औरंगाबादचा पॉझिटिव्हीटी रेट 5.38 टक्के तर ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी 20.34 इतकी आहे.

औरंगाबादेत सोमवारपासून काय सुरू होणार?
अत्यावश्यकसह इतर दुकाने नियमित वेळेत सुरू राहतील. रेस्टॉरंट, मॉल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील. खासगी, सरकारी कार्यालये १०० टक्के सुरू होतील. थिएटर सुरू होतील. सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना १०० टक्के सूट दिली आहे. ई-कॉमर्स सुरू राहील. पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार आहेत. बस १०० टक्के क्षमतेने सुरू होतील. इतर राज्यांतून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहील.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!