मुंबई : मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. या दोन्ही शहरांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. मुंबईच्या नाईट क्लबमध्ये तर कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडालेला आहे. त्यामुळे सर्वात आधी नाईट क्लब बंद होऊ शकतात, असे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अस्लम शेख यांनी हे संकेत दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून नाईट क्लबमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसत आहे. काही नाईट क्लबवर कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. पण त्याने काहीही फरक पडलेला दिसत नाही, असं सांगतानाच मुंबईत पहिल्यांदा नाईट क्लब बंद होऊ शकतात, असं शेख म्हणाले. काल मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. जिथं जिथं केसेस वाढत आहेत. त्या ठिकाणी अंशत: लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदी आणि इतर निर्बंध लावण्यात येणार आहेत. स्थानिक प्रशासनाला तसे आदेश देण्यात आले आहेत. केसेस वाढत राहिल्यास मुंबईतही अंशत: लॉकडाऊन लागू शकतो, असही त्यांनी सांगितलं.
मुंबई आणि ठाण्यात कोरोनाच्या केसेस मध्ये वाढ होत आहे. त्यावर आरोग्य यंत्रणा नजर ठेवून आहे. या बैठकीत लोकल ट्रेन आणि बेस्ट बसेसमधील गर्दीवरही चर्चा झाली. तसेच लग्न समारंभांवरही चर्चा झाली, असं त्यांनी सांगितलं. रात्री अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे रात्रीची संचारबंदी लावण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
राज्यात ज्या ज्या ठिकाणी गर्दी होत आहे, त्या ठिकाणी निर्बंध येऊ शकतात. त्याबाबत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत, असं सांगतानाच कोरोना केसेस वाढत असल्या तरी लॉकडाऊन हा त्यावर पर्याय नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या
- आरएसएसचा स्मगलरांशी काय संबंध ? केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या अमित शहांना थेट सवाल
- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून नाना पटोले शिवसेना, राष्ट्रवादीवर संतापले ?
- ‘सात बाई सात, बायका सात! जिवाची सफर, आता राणीच्या देशात!’ बीग-बी चे टि्वट
- जाणून घ्या मोदी सरकारने खरंच मराठा समाजाच्या व महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला का ?
- मंत्र्यांवर आरोपांची सरबत्ती, मात्र फडणवीस सरकारच्या तुलनेत ठाकरे सरकारच्या काळात महिला अत्याचारात घट !


