मुंबई : काल महिलादिनी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी “सात बाई सात…बायका सात! जिवाची सफर…आता राणीच्या देशात!” असे टि्वट केले होते. या टि्वटच्या माध्यमातून बिग-बी नी दिग्दर्शक व लेखक हेंमत ढोमे यांच्या नव्या कोऱ्या ‘झिम्मा’ या मराठी चित्रपटाचा टिझर शेअर केला आहे.
कोरोना प्रादुर्भावानंतर तगडी स्टारकास्ट घेउन लेखक व दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आपल्या ‘झिम्मा’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘झिम्मा’ या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टितील सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले, सुचित्रा बादेंकर आणि निर्मीती सांवत यासारखी तगडी स्टारकास्ट आहे. मनसे नेते अमेय खोपकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
T 3836 – सात बाई सात…
बायका सात!
जिवाची सफर…
आता राणीच्या देशात!https://t.co/kaTOz1VGX9#Jhimma #23April #Intheatres #TeaserOutNow #AVK— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 8, 2021
बिग-बी अमिताभ बच्चन यांनी टि्वट केल्याबद्दल सर्व कलाकारानी बिग-बी चे आभार व्यक्त केले आहे. बिग-बी सोबतच बॉलीवुडचा आघाडीचा गायक मिका सिंगनेही ‘झिम्मा’ या चित्रपटाचा टिझर टि्वट केला आहे. हा चित्रपट येत्या २३ एप्रिल रोजी प्रदर्शीत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- मंत्र्यांवर आरोपांची सरबत्ती, मात्र फडणवीस सरकारच्या तुलनेत ठाकरे सरकारच्या काळात महिला अत्याचारात घट !
- विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच, ‘या’ नेत्याचे नाव निश्चित ?
- अजितदादांनी अर्थसंकल्पातून महिलांबाबत केलेल्या घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक ?
- ‘१७ वर्षांपासूनच्या लढ्याला यश मिळाले’ अर्थसंकल्पानंतर शिवाजीराव आढळराव पाटीलांची प्रतिक्रिया
- ‘त्या’ निनावी फोनने वाचले दोघींचे आयुष्य


