मुंबई : धनंजय मुंडे, मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोपानंतर आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य झालेल्या महाविकासआघाडी सरकारच्यादृष्टीने एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या तुलनेत महाविकास आघाडीच्या काळात महिला व बालकांवरील अत्याचाराचे प्रमाण घट झाल्याच आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.
राज्यात फडणवीस सरकारच्या काळात २०१८ साली महिला अत्याचाराचे ३५५०१ तर २०१९ साली ३७११२ इतके गुन्हे नोंदवण्यात आलेले होते. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर २०२० साली मात्र महिला अत्याचाराच्या प्रमाणात १० हजारांपेक्षा जास्त संख्येने घट झाली असून महिला अत्याचाराच्या २६५८६ इतक्या गुन्ह्यांची झाली आहे.
तसेच २०१८ मध्ये बालकांवरील अत्याचाराचे १५५४४ तर २०१९ मध्ये १७५१७ गुन्हे नोंद झाले होते. २०२० साली मात्र बालकांवरील अत्याचाराचे हे प्रमाण तब्बल ६ हजारांनी घटून बालकांवरील अत्याचाराच्या १११५४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
फडणवीस सरकारच्या काळात महिला व बालकांवरील अत्याचाराचा वाढता आलेख महाविकास आघाडी सरकारच्या काळात हजारोंच्या संख्येने घटल्याची बाब यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या आधारावर आर्थिक पाहणी अहवालात ही आकडेवारी सादर करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच, ‘या’ नेत्याचे नाव निश्चित ?
- अजितदादांनी अर्थसंकल्पातून महिलांबाबत केलेल्या घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक ?
- ‘१७ वर्षांपासूनच्या लढ्याला यश मिळाले’ अर्थसंकल्पानंतर शिवाजीराव आढळराव पाटीलांची प्रतिक्रिया
- ‘त्या’ निनावी फोनने वाचले दोघींचे आयुष्य
- ‘महाराष्ट्रधर्म, हिंदवीस्वराज्य प्रथम’ म्हणत वर्धापन दिनी राज ठाकरेंच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा !


