तिरुवनंतपुरम : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी सोने आणि डॉलर तस्करीच्या प्रकरणात केरळ सरकारला सात प्रश्न विचारले होते. त्याला केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. प्रत्युत्तर देताना आता विजयन यांनी आरएसएसचा स्मगलरांशी काय संबंध आहे, असा प्रतिप्रश्न अमित शाहांना विचारला आहे.
केरळमधील सोने आणि डॉलरच्या तस्करीची लिंक ही केरळ सरकारशी जुळली असल्याचा आरोप अमित शाहा यांनी केला होता. तपास यंत्रणांचा हवाला देऊन शहा यांनी हा आरोप केला होता. तस्करीतील आरोपींनी मुख्यमंत्री विजयन, विधानसभा अध्यक्ष पी. श्रीरामकृष्णन आणि अनेक मंत्र्यांविरोधात सनसनाटी आरोप केल्याचे कस्टम विभागाने हायकोर्टात सांगितल्याचा दावा अमित शाहा यांनी केला होता.
अमित शाहांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना केरळच्या मुख्यमंत्र्यांनी हे आरोप म्हणजे केरळचा अपमान असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, अमित शाहा यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केरळचा अपमान केला. केरळ ही भ्रष्टाचाराची भूमी असल्याचे ते म्हणाले. अनेक एजन्सींनी भारतामध्ये केरळ हे सर्वात कमी भ्रष्ट असल्याचे प्रमाणित केले आहे. मात्र काँग्रेसनेसुद्धा अमित शाहांच्या या विधानावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही, कारण हे दोघेही एकसारखेच आहेत.
विजयन पुढे बोलताना म्हणाले की, संघ परिवारामधील एक ज्ञात व्यक्ती डिप्लोमॅटिक बॅगेजमध्ये सोन्याची तस्करी करण्यामधील मुख्य सूत्रधार नाहीये? तुम्हाला हे माहिती नाही का? सीमा शुल्क पूर्णपणे सोन्याच्या तस्करीसारख्या देशविरोधी कृतीला रोखण्यासाठी जबाबदार नाही आहे. तिरुवनंतपुरम विमानतळ पूर्णपणे केंद्र सरकारच्या अधीन नाही आहे, असे प्रतिप्रश्न विजयन यांनी केली.
भाजपा सत्तेवर आल्यानंतर तिरुवनंतपुरम विमानतळ सोन्याच्या तस्करीचे केंद्र कसे बनले? सोन्याची तस्करी सुलभपणे करण्यासाठी या विमानतळावरील विविध पदांवर संघ परिवारातील लोकांची जाणीवपूर्वक नियुक्ती नाही करण्यात आली नाही का? असा सावालही विजयन यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- मंत्र्यांवर आरोपांची सरबत्ती, मात्र फडणवीस सरकारच्या तुलनेत ठाकरे सरकारच्या काळात महिला अत्याचारात घट !
- विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच, ‘या’ नेत्याचे नाव निश्चित ?
- अजितदादांनी अर्थसंकल्पातून महिलांबाबत केलेल्या घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक ?
- ‘१७ वर्षांपासूनच्या लढ्याला यश मिळाले’ अर्थसंकल्पानंतर शिवाजीराव आढळराव पाटीलांची प्रतिक्रिया
- ‘त्या’ निनावी फोनने वाचले दोघींचे आयुष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

