Share

‘थोडी तरी लाज वाटू दे…’ कंगना आणि दिलजितच शेतकरी आंदोलनावरून युद्ध सुरूच!

Published On: 

मुंबई : सुशांत सिंग मृत्यू प्रकारानंतर अभिनेत्री कंगना रणौत हीच कोणत्या ना कोणत्या वादावरून ट्वीटर वरून प्रतिक्रिया देण्याच सत्र सुरु आहे. याच दरम्यान धार्मिक तेढ निर्माण करण्याप्रकरणी कंगनावर मुंबई पोलिसांनी कारवाई देखील केली आहे. त्यांनतर अद्याप देखील कंगणाचे हे ट्वीटर युद्ध सुरूच आहे. आता कंगनाने शेतकरी आंदोलन प्रकरणी अभिनेता आणि गायक दिलजित दोसांजवर निशाना साधला.

शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या दिलजीत आणि प्रियांका चोप्रावर कंगनाने ट्विटमधून निशाणा साधला होता. कंगनाने दिलजीतवर शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप लावला होता.

कंगनाने प्रियांका आणि दिलजीतला टॅग करत ट्विट लिहिले होते की, ‘शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी येणार खर्च ७० हजार कोटी आहे. आंदोलनामुळे इंडस्ट्री आणि छोट्या फॅक्टऱ्यांची इकॉनॉमी संथ झाली आहे. याने दंगे भडकू शकतात. दिलजीत आणि प्रियांका तुम्हाला समजतंय ना….आपल्या अॅक्शनचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. प्लीज मला सांगा..कोण याची भरपाई करेल?’. यावर आता दिलजीतने उत्तर दिलं आहे.

दिलजीतने कंगनाला उत्तर दिले. दिलजीतने लिहिले की, ‘गायब होण्याचं जाऊदे….पण तुला हे ठरवण्याचा अधिकार कुणी दिला की, कोण देशद्रोही आहेत आणि कोण देशभक्त आहेत? हा अधिकार आला कुठून? शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याआधी कमीत कमी लाज वाटली पाहिजे’. अशा शब्दात कंगनाला दिलजीतने चांगलेच खडसावले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!