Share

“अन्नदात्यासह आता अन्नपूर्णेवरही वार, देशाला आणखी किती लाचार करणार आहात?”

Published On: 

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा कहर तुलनेने कमी झाला असला, तरी इंधन दरवाढीचा कहर मात्र आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकार, प्रशासनाबरोबरच लोकांनीही बरोबरीची जबाबदारी निभावली. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर नियंत्रण ही मात्र वाढतच आहे.

याच दरम्यान गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरून काँग्रेचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं असून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘अन्नदात्यासह आता अन्नपूर्णेवरही वार. देशाला आणखी किती लाचार करणार आहात?’ असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे. तसेच LPGPriceHike हा हॅशटॅग देखील वापरला.

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या मागील १५ दिवसांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये १०० रुपयांनी वाढ केली आहे. घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलो वजनाचा गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. तर पाच किलोच्या गॅसच्या किंमती १८ रुपयांनी वाढवल्या आहेत. त्याचप्रमाणे १९ किलो सिलिंडरसाठी आता ३६.५० रुपये जास्त मोजावे लागणार आहे.यावेळी बुधवारी गॅस सिलिंडरच्या ५० रुपयांची वाढ करण्यात आली.

विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत ६४४ रुपयांवरून ६९४ रुपये झाली आहे. याआधी १ डिसेंबरला सिलिंडरदरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. तत्पूर्वी जुलैमध्ये गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, चालू महिन्यात गॅस सिलिंडरच्या किमतीत एकूण १०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे विनाअनुदानित सिलिंडरसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. दरम्यान, हवाई इंधन दरामध्येही ६.३ टक्के वाढ करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!