Share

कृषी कायद्याविरोधातील ‘भारत बंद’ला कोल्हापुरात स्वतःला गाडून घेत दिला पाठिंबा…

Published On: 

कोल्हापूर: केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. याआधी देखील झालेल्या बैठका शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. त्यामुळे आता आजच्या भारत बंद नंतर तरी या आंदोलनाला यश येणार का ? असा सवाल आंदोलकांना पडला आहे.

या पार्श्वभूमीवर देशभरात आज केंद्रा सरकारच्या कृषी कायद्याविरोधात भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज कोल्हापुरात क्रांतिसिंह नाना पाटील नगर कृती समितीच्या सदस्यांनी स्वतःला गाडून घेऊन या भारत बंदला पाठिंबा दिला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.स्वतःला गाडून घेऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनाथ आज संपूर्ण देश रस्त्यावर उतरला असून केंद्र सरकारचा लागू केलेला कृषी विधेयक कायदा रद्द करा, अशी मागणी आंदोलनाद्वारे केली आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यातदेखील भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असून वर्दळीच्या ठिकाणी शुकशुकाट आहे.

कोल्हापुरात भाजप वगळता जवळपास सर्वच पक्षांनी शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकात आज क्रांतिसिंह नाना पाटील नगर कृती समितीच्या सदस्यांनी स्वतःला गाडून घेऊन केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध व शेतकऱ्यांच्या समर्थनात हे आंदोलन केलं.हजार वर्षापूर्वी बळीराजाला व्यापारी प्रवृत्तीने गाडले. याचीच पुनरावृत्ती या कृषी कायद्याच्या माध्यमातून होणार आहे. कृषी कायद्यामुळे शेतकरी पुन्हा गाडला जाणार आहे. त्याचे भूमिपुत्र म्हणून आम्ही स्वतःला गाडून घेत केंद्र सरकारच्या या कायद्याचा निषेध करत आहोत. असे कृती समितीचे सदस्य व माजी नगरसेवक अमोल माने म्हणाले, कृषी विधेयक मागे घेऊन सरकारची जुलमी व्यवस्था बंद करावी, शेतकऱ्यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी देखील यावेळी माने यांनी केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!