मुंबई : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.
9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.
मुंबईमध्ये काँग्रेस पक्ष कृषी कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी, ‘शेतकरीविरोधी कायद्यांमार्फत जनतेचं अन्न ताब्यात घेण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना अडचणीत आणून शेतमाल स्वस्तात खरेदी करण्याचं आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या नष्ट करण्याचं काम भाजप सरकार करतंय. याचा आम्ही निषेध करतो’ अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
शेतकरीविरोधी कायद्यांमार्फत जनतेचं अन्न ताब्यात घेण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना अडचणीत आणून शेतमाल स्वस्तात खरेदी करण्याचं आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या नष्ट करण्याचं काम भाजप सरकार करतंय. याचा आम्ही निषेध करतो: प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात#BharatBandh pic.twitter.com/SemurYFPsA
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) December 8, 2020
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधीनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- ‘माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच’, हेमंत ढोमेंचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा
- ‘…म्हणून भारत बंदमध्ये शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना सहभागी होणार नाही’
- भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष – नवाब मलिक
- भारतीय वंशाच्या ‘या’ नशीबवान व्यक्तीला सर्वात प्रथम मिळणार कोरोनाची लस


