Share

पायातली ‘कोल्हापुरी’ हातातही घ्यायला शिका; राजू शेट्टींचा शेतकऱ्यांना सल्ला

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद :  कोल्हापुरची माणस नुसतेच कोल्हापुरी पायतन घालत नाहीत. तर वेळप्रसंग पडला तर हातात सुध्दा घेतात म्हणून त्यांना न्याय मिळतो. लक्षात ठेवा म्हणून तुम्ही पायत हातात घ्यायला शिका काटा मोडतो म्हणूनच पायात घालायचं नाही. कधी कधी पायतनाचा उपयोग दुसऱ्या कारणासाठी सुध्दा करायचा असतो, तो नाही केला तर तुम्हाला आयुष्यात न्याय मिळणार नाही. लढायला शिका, रडत बसू नका, असा असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

तुमचे कारखानदार सात आठ महीने ऊसाचे पैसे देत नाही. हे दुर्दैव आहे. कायदा काय सांगतो ऊस तोडणीनंतर १४ दिवसांच्या आत सरकारने जो बांधून दिलेला हमी भाव आहे. त्याप्रमाणे विना कपात एक रक्कमी रक्कम दिली पाहीजे. नाही दिले तर त्याला १५ टक्के व्याजाची आकारणी करुन पैसे शेतकऱ्यांना द्यावे. पण हे कारखानदार वेळेवर पैसे देत नाहीत. तुम्ही गप्प का बसता आवाज उठवा असे आवाहनही शेट्टी यांनी यावेळी केले आहे.

लोहारा तालुक्यातील माकणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाभिमानी संघटनेच्यावतीने शुक्रवारी राञी आठ वाजता ऊस व सोयाबीन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी बळीराम दळवे हे होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!