🕒 1 min read
अहमदनगर : आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत-जामखेड मतदारसंघात होत असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांचे भाषण सुरू असताना प्रेक्षकांमधून काही जण विविध मागण्या आणि सूचना करत होते. शेवटी अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत त्यांचा चांगलाच समाचार घेतला.
अजित पवार यांनी कार्यक्रमामध्ये रोहित पवार यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. विकास कामांची माहिती देत असताना कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांपैकी काही जण त्यांना सूचना करत होते. वीज पुरवठा, शेतीमालाचा भाव वगैरे संबंधी मुद्दे मांडत होते. एक दोनदा दुर्लक्ष केल्यानंतर अखेर अजित पवार त्यांच्यावर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले.
तुला लईच कळतंय रं. येथे येऊन भाषण कर. आम्ही काय असेच उठून आलेलो नाही. सात वेळा दीड दीड लाख मते घेऊन निवडून आलो आहोत. आमच्या बारामतीत असे कोणी मध्ये बोलत नाही. मी बोलत असताना लोक चिडीचूप असतात. येथे मधे मधे बोलायची सवय आहे. उगीच रोहितला त्रास व्हायला नको म्हणून ऐकून घेतो. नाही तर माझा हिसका दाखविला असता. ऐकून घेतोय तर मधे मधेच बोलतात, अशा शब्दांत मध्येमध्ये बोलणाऱ्यांना अजित पवारांनी सुनावले आहे.
महत्वाच्या बातम्या
- …तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्हाला त्यांना संपवावं लागेल- नितेश राणे
- आमचं सरकार पाडण्यासाठी भाजपची कारस्थानं सुरु आहेत- संजय राऊत
- “…तर मी माझा पुरस्कार परत करेन”; कंगनाची प्रतिक्रिया
- हसन अलीला ट्रोल केल्याबद्दल पाकिस्तानी चाहत्यांवर भडकला हरभजन, म्हणाला…
- एकरकमी ‘एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; दोन ट्रॅक्टरला लावली आग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
