🕒 1 min read
मुंबई : दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, नवाजुद्दीन सिद्दीकी असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर आपली ओळख निर्माण केली. यापैकीच एक म्हणजे ‘उरी’ फेम अभिनेता विकी कौशल. आज बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जाणारा विकी एकेकाळी ‘दहा बाय दहाच्या खोली’त राहत असे याचा खुलासा स्वतः विकीने डिस्कव्हरीवरील लोकप्रिय शो ‘इनटू द वाइल्ड विथ बेयर ग्रील्स’मध्ये केला आहे.
अभिनेता विकी कौशल लवकरच लोकप्रिय शो ‘इनटू द वाइल्ड विथ बेयर ग्रील्स’मध्ये दिसणार आहे. या शोमध्ये बेयर ग्रील्सशी बोलताना विकीनं त्याच्या पूर्वीच्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा दिला. याचवेळी त्यानं आपला जन्म दहा बाय दहाच्या खोलीत झाला असल्याचाही खुलासा केला. विकी म्हणाला, ‘माझा जन्म दहा बाय दहाच्या खोलीत झाला. ज्यात किचन आणि बाथरूमचाही समावेश होता. अशा घरात माझा जन्म झाला आणि आमच्या कुटुंबाचा प्रवासही इथून सुरु झाला. एक कुटुंब म्हणून आम्ही आयुष्यातील प्रत्येक पायरी पाहिली आहे. अनुभव घेतला आहे आणि मला वाटतं हीच गोष्ट भविष्यात तुम्हाला एक व्यक्ती म्हणून खंबीर होण्यास मदत करते.’
विकी कौशलनं अभिनेता होण्याआधीच त्याचं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. विकीने अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या बॉलिवूड कारकिर्दिला सुरुवात केली होती. मात्र ‘मसान’ या चित्रपटातून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘संजू’ या चित्रपटातही त्यानं छोटीशीच पण महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. विकीला खरी ओळख मिळवून दिली ती दिग्दर्शक आदित्य धर यांच्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटानं. विकीचा हा चित्रपट तूफान गाजला आणि त्यानंतर विकीनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. तसेच नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘सरदार उधम सिंग’ या चित्रपटाचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. आगामी काळात तो अभिनेत्री सारा अली खानसोबत ‘द इमॉर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या बायोपिकमध्येही तो झळकणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा- राज ठाकरे
- पुस्तकाच्या वादावर सलमान खुर्शिद यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- एकरकमी ‘एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; दोन ट्रॅक्टरला लावली आग
- कंगनाबेनच्या बाबतीत टिळकांचं विधान तंतोतंत खरं- संजय राऊत
- ‘जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
