औरंगाबाद : धावत्या रेल्वे समोर प्रेम विरहातून एका २५ वर्षीय मुलाने जीव दिल्याची घटना सोमवारी सकाळी छावणी उड्डाणपुला खाली उघडकीस आली. ऋषिकेश भाऊसाहेब लहाने असे तरुणाचे नाव असून मंगळवारी तपासात पोलिसांना सुसाईड नोट सापडली. त्यावर त्याचे एका मुली वरून प्रेम करून चुकल्याचे नमूद होते.
कन्नड तालुक्यातील रहिवाशी असलेला ऋषिकेश हा मागील काही वर्षांपासून बजाज नगर भागात राहत होता. सोमवारी काही नागरिकांना उड्डाणपुला खाली रेल्वे रुळावर एका तरुणाचा मृतदेह दिसला. त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क केला. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
त्याच्या जवळ सापडलेल्या कागदपत्राने त्याची ओळख पटली. मृतदेहाला उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शवगृहात मृतदेहाची तपासणी करत असताना पोलिसांना त्याच्या खिशात मंगळवारी एक चिट्ठी सापडली त्यात त्याने एका मुलीवर प्रेम करून माझी चूक झाली आहे. मी आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहिलेले होते. या प्रकरणी छावणी पोलीओस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींसह सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह जाहिरात; काँग्रेसचं कंपनीविरोधात खळ्ळ-खट्याक !
- आधी रक्तदान करा आणि त्यानंतरच कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या – विजय वडेट्टीवार
- बीड जिल्हाबंदी; नाकाबंदीवर पोलिसांसोबत शिक्षक देखील तैनात
- राज्यभर आरोग्य सुविधांचा बोजवारा, आरोग्यमंत्री फक्त तोंडपाटीलकीत बिझी
- प्रवासी संख्या कमी असल्याने काही रेल्वे केल्या रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

