Share

‘विरोधकांना मलिकांच्या राजीनाम्याचा आसुरी आनंद घेऊ देणार नाही’ – छगन भुजबळ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: नवाब मलिक यांची ८ तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी राज्यभरात गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. विरोधकांनी नवाब मलिक यांच्या अटकेची मागणी केली आहे. राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात मुख्यमंत्र्याच्या वर्षा या निवास्थानी बैठक पार पडली.

या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिक यांना अटक झाली ही दुर्दैवाची बाब असल्याचं छगन भुजबळ म्हणाले आहेत. तसेच नवाब मलिक हे सातत्याने केंद्र सरकारबद्दल तसेच राज्यातील विरोधी पक्षावर वारंवार बोलत असतात म्हणून त्यांचं तोंड बंद करण्यासाठी ईडी कडून ही कारवाई करण्यात आली आहे, असं मत छगन भुजबळ म्हणाले.

नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ उद्या महाविकास आघाडी सरकारमधील नेते मंत्रालयाच्या बाजूच्या मैदानावर आंदोलन करणार असल्याचं देखील यावेळी भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत, मात्र राजीनामा घेण्याचं काहीही कारण नसल्याचं भुजबळ यांनी सांगितलं आहे. जोपर्यंत दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा दिला जाणार नाही, विरोधकांना राजीनाम्याचा आसुरी आनंद मिळू देणार नाही, असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!