🕒 1 min read
धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल गोटे यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे. या प्रसिद्धीपत्रकात गोटे म्हणाले कि, ‘आघाडीत सत्तारुढ पक्षातील काही नेते विरोधकांना आवडतील अशी वक्तव्य करीत आहेत. आघाडीत सहभागी असलेले तीनही पक्ष स्वखुशीने सत्तेत आले आहेत. कुणीही कुणाला बळजबरी केलेली नाही. ती जबाबदारी आपण स्वेच्छेने स्विकारली आहे.
ती आपली जबाबदारी ओळखूनच आनंदाने पार पाडली पाहिजे. 1978 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोदचे सरकार आलं. त्या सरकारमध्ये जनसंघ, समाजवादी, प्रजासमाजवादी, शेतकरी कामगार पक्ष तसेच काँग्रेस पक्षातील असंतुष्ट नेते आणि शरद पवारांचा एस. काँग्रेस वगैरे सहभागी होते. मतभेद तेंव्हाही होते. मंत्रीमंडळाच्या बैठकीत तेंव्हाही खडाजंगी होत असे. पण चुकूनही वृत्तपत्रात एकही वेडी-वाकडी बातमी आली नाही.
याउलट अनेक नेते प्रसिध्दी माध्यमांना स्वतःहून खाद्य पूरवित आहेत, हे काही शोभादायक नाही. आपले हसू होते हे कोणीतरी खडसावून सांगण्याची गरज आहे. हे कटू सत्य सांगण्याचे धाडस कुणीतरी करणे आवश्यक आहे. हा वाईटपणा घेण्याची जबाबदारी मी स्वतःहून स्वीकारली आहे. आज आपण आपला पक्ष सत्तेत आहे म्हणूनच आपण काय बोलतो? याला प्रसिध्दी माध्यमामध्ये वजन आहे किंवा किंमत आहे.
सत्ता गेल्या नंतर आपली काय अवस्था होते हे आपण सर्वांनीच मागील पाच वर्षात अनुभवले आहे. आपण आत्मघात करुन पदरी काय पाडून घेणार आहोत . याचा अंतर्मुख होऊन प्रत्येकाने विचार करावा. अन्यथा, अशा वर्तवणूकीला भिकेचे डोहाळे लागले असेच म्हणावे लागेल,’ असे गोटे त्यांच्या प्रसिद्धीपत्रकातून म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘ज्यावेळी कॉलर वर आणायची असेल, त्यावेळी संभाजीराजेही काही कमी पडत नाहीत’
- ‘लोकांच्या लक्षातही येणार नाही अशा प्रकारे मोदी सरकार खिसा कापत आहे’
- पंतप्रधान मोदी युवकांना म्हणाले, ‘ज्याच्याकडे स्किल असेल तोच पुढे जाईल’
- …अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरु करु, खासदार संभाजी छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- आमिर-किरणचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

