Share

पाणी प्रश्नी आग्रही भुमिका मांडणारे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सहकार मधील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे (Former Minister Shankarrao Kolhe) यांचे आज (१६ मार्च) पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान आज सायंकाळी साडेचार वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी पाणीप्रश्नी नेहमी आग्रही भुमिका मंडळी होती. राज्यातील एक अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. कोपरगाव येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ शंकरराव कोल्हे यांनी रोवली होती.

दरम्यान सहा दशकात त्यांनी महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क या मंत्रिपदावर काम केले. शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. येत्या २१ मार्चला त्यांचा वाढदिवस होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!