नागपूर : स्वबळाच्या घोषणेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला असून लोणावळा येथील कार्यक्रमात कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोपही यावेळी पटोले यांनी केला.
या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. ‘नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा केल्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला कापरं भरलेलं आहे. त्यांना पाणी देखील जात नाही. त्यांना जेवण देखील जात नाही, असं नाना पटोलेंच्या बोलण्यावरून दिसतंय. ते इतके का घाबरले आहेत, हे त्यांनी सांगावे’, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज ते नागपुरात बोलत होते.
तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. पटोलेंच्या विधानामुळे आघाडीत विसंवाद असून राज्य सरकारमध्ये अविश्वासाचे वातावरण असल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावा दरेकर यांनी केला आहे.
आघाडी तोडायला कोणीही गेले नाही. तिन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत. दुसरीकडे एकत्र असल्याचा कांगावाही करत आहेत. कोरोना काळात या तिन्ही पक्षांनी एकत्र बसून काय निर्णय घेतला? केंद्राने यांना मदत केली. यांना आपापसातल्या भांडणातून वेळ मिळत नाही. त्यांच्यात वाद आहेत. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात सतत काऊंटर करत आहेत. असेही दरेकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- मंत्रिपदाची नाराजी! ७७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन भाजप जिल्हाध्यक्ष पंकजा मुंडेंच्या भेटीला
- कोरोनामुळे बॉलीवूडला आर्थिक झळ! तरीही या अभिनेत्याने खरेदी केली कोट्यावधी रुपयांची कार
- संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार ? ; उर्मिला मातोंडकर म्हणाल्या…
- सावळ्या रंगामुळे सोनालीला देखील करावा लागला वर्णभेदाचा सामना; अनुभव शेअर करत म्हणाली …
- महाराष्ट्रात आज कोरोनाचे ८ हजार ५३५ नवे रुग्ण तर ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त


