Share

ना कॉल, ना ओटीपीची मागणी; थेट खात्यातून ९३ हजार काढत कंपनीतील अधिकाऱ्याला गंडा

Published On: 

औरंगाबाद : ना कॉल , ना ओटीपीची मागणी करता, क्रेडिट कार्डवरुन दोन ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या ऍपद्वारे परस्पर ९३ हजार ५२५ रुपये लंपास झाले आहे. अनूप श्रोत्रीय (५०) असे फसवणूक झालेल्या एका कंपनीतील अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माछर इंडस्ट्री मध्ये चिफ फायनान्सीयल ऑफिसर असलेल्या श्रोत्रीय यांना ११ मे रोजी दुपारी त्यांच्या मोबाईलवर बँकेचे मेसेज प्राप्त झाले. साधारण पाच सलग आलेल्या मेसेज मध्ये त्यांच्या बँकेच्या क्रेडिट कार्ड खात्यातून फ्रिचार्ज व मोबीक्विक या दोन ऍपवर पैसे वळते झाल्याचा उल्लेख होता. अवघ्या पाच मिनिटांमध्ये सायबर गुन्हेगारांनी पहिल्या टप्प्यात ८ हजार २९६ रुपये, दुसऱ्या टप्प्यात ४७ हजार ८९२ रुपये, तीसऱ्या टप्प्यात ८ हजार २९६ रुपये, चौथ्या टप्प्यात ८ हजार २९६ तर शेवटी ८ हजार २९६ रुपये वळते झाले.

या सर्व प्रक्रियेदरम्यान किंवा आधी मला कुठलाही कॉल आला नाही तसेच मी कोणाला कुठलाही ओटिपी शेअर केलेला नसल्याचा दावा श्रोत्री यांनी तक्रारीत केला आहे. घटनेनंतर त्यांनी तत्काळ बँकेशी संपर्क साधत याप्रकरणी तक्रार दाखल केली. परंतू तरीही ८ जून राेजी त्यांना क्रेडिट कार्डचे बील मिळाले. त्यानंतर त्यांनी मुकूंदवाडी पाेलिसांकडे तक्रार दिली. पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर अधिक तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!