Share

‘तेरणा’ सुरू करण्यासाठी जनआंदोलन पेटणार, नेत्यांना गावबंदीचा इशारा

Published On: 

उस्मानाबाद : ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना बचाव समितीची बैठक पार पडली. यावेळी कारखाना सुरू करण्यासाठी समितीच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तेरणा कारखान्याची निविदा प्रक्रिया एक महिन्याच्या आत पूर्ण करा, अन्यथा आंदोलनाला सामोरे जा, असा इशारा जिल्हा बँकेच्या प्रतिनिधींसह लोकप्रतिनिधींना दिला. त्यामुळे तेरणासाठी लवकरच आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत.

तेरणा सहकारी साखर कारखाना मराठवाड्यातील सर्वात जुना आणि मोठा असलेला कारखाना मानला जातो. परंतू. कारखाना गेल्या नऊ वर्षापासून बंद अवस्थेत आहे. कारखाना सुरू व्हावा याकरिता आतापर्यंत अनेक आंदोलने झाली. परंतू कारखाना काही सुरू झाला नाही.
उसाचे वाढलेले क्षेत्र, कोरोनानंतरची परिस्थिती, यामुळे कारखान्याच्या शेतकरी सभासदांनी व कर्मचाऱ्यांनी बिगर राजकीय तेरणा बचाव संघर्ष समितीची स्थापना केली. परंतू कोरोनामुळे २२ फेब्रुवारीचे साखळी उपोषण स्थगित करून लाक्षणिक आंदोलन केले.

यानंतर तेरणा बचावा संघर्ष समितीने सरकार दरबारी आवाज उठवण्यासाठी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार, संजय निंबाळकर यांची भेट घेऊन कारखाना चालू करण्यासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याची मागणी केली.

आता ढोकी येथे तेरणा बचाव संघर्ष समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत तेरणा सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच लोकप्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका घेऊन तेरणा सहकारी साखर कारखान्याची निविदा प्रक्रिया तातडीने एक महिन्याच्या आत पूर्ण करावी. अन्यथा लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी प्राथमिक टप्प्यात घंटानाद अंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. त्यानंतर खासदार, आमदार यांना गावबंदी करण्यात येईल. तेरणा बचाव संर्घष समितीतील सभासद, कामगार,व्यापारी आणि नागरिकांनी घेतल्याने तेरणाच्या लढ्याला आक्रमक स्वरुप आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!