मुंबई: बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध कलाकारांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. तापसी पन्नू, अनुराग कश्यप, मधु मेंटेना,विकास बहल यांच्या घरी छापेमारी आयकराने सकाळी छापेमारी केली आहे. कर प्रकरणामध्ये छापेमारी करण्यात आली आहे असं सांगण्यात येतंय.
‘फँटम फिल्म’शी संबंधित लोकांच्या घरांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मधू मंटेना यांची कंपनी ‘क्वान’ यांच्या कार्यालयावरही छापे मारण्यात आले. कर चुकवल्याच्या आरोपाखाली हे छापे टाकण्यात आले असून, मुंबईतील तब्बल २२ ठिकाणांची झाडाझडती आयकर विभागाकडून घेतली गेली. यात फँटम प्रोडक्शन हाऊसशी संबंधित अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या मालमत्तावर आयकरने धाडी टाकल्या.आयकर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कर चोरी प्रकरणी या अभिनेत्यांवर छापेमारी करण्यात आली.
फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती क्षेत्रातील खासगी कंपनी आहे. तिची स्थापना २०१० मध्ये झाली. अनुराग कश्यप, विकास बेहेल, मधू मंटेना यांनी फँटमची उभारणी केली. चित्रपट निर्मिती आणि वितरणाचं काम फँटम कंपनी करते. अनुराग कश्यप या कंपनीचा मालक आहे. विकास बेहेल यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानं २०१८ मध्ये त्याची फँटममधून हकालपट्टी करण्यात आली. मार्च २०१५ मध्ये कंपनीतील ५० टक्के हिस्सा रिलायन्स इंटरटेनमेंटनं खरेदी केला.
Finding myself in a bit of turmoil. Representing ???????? for the first time as a coach for some great athletes, meanwhile I-T department is raiding Taapsee’s houses back home, putting unnecessary stress on her family, especially her parents. ????♂️. @KirenRijiju please do something????????.
— Mathias Boe (@mathiasboe) March 4, 2021
यावर आता अभिनेत्री तापसी पन्नू हिने आणि तिचा प्रियकर काही भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण देणारा तापसी पन्नूचा प्रियकर मॅथियस बोई याने देखील ट्वीट करात आपली प्रतिक्रिया दिली असून त्यने हे ट्वीट केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट केल आहे. बोई म्हणला की, “मी थोडा गोंधळलो आहेत. पहिल्यांदाच काही महत्वाच्या खेळाडूंचा प्रशिक्षक म्हणून भारताचं नेतृत्व करत आहे. यादरम्यान तापसीच्या घरावर आयकराने धाड टाकत आहे, यामुळे कुटुंबाला आणि खासकरुन तिच्या आई-वडिलांना विनाकारण त्रास होत आहे. किरेन रिजिजू कृपया काहीतरी करा”. अशी विनंती त्याने केली आहे.
Law of the land is supreme and we must abide by that. The subject matter is beyond yours and my domain. We must stick to our professional duties in the best interest of Indian Sports. https://t.co/nIIf5C8TXL
— Kiren Rijiju (@KirenRijiju) March 5, 2021
मॅथियसच्या या ट्विटला किरेन रिजिजू यांनी उत्तर दिलं असून म्हटलं आहे की, “कायदा सर्वोच्च असून, त्याच्याशी बांधील राहिलं पाहिजे. हा विषय आपल्या हातात नाही. पण आपल्या व्यवसायिक कर्तव्याशी बांधील राहिलं पाहिजे आणि भारतीय खेळासाठी जे सर्वोत्तम आहे ते केलं पाहिजे” असे प्रतिउत्तर रीजीजू यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपनंतर ‘महाविकास’कडूनही धनगर समाजाची अवहेलना, धनंजय मुंडेंची खंत
- पालकमंत्री देसाई दोन दिवसात घेणार शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी बैठक
- मराठवाड्यात ऑक्सिजन टँक वाढवण्याच्या विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांच्या सूचना
- स्वॅब न देताच रुग्ण येत आहेत कोरोना पॉझिटिव्ह; बुलढाण्यातील अजब प्रकार समोर !
- टीसीच्या नोकरीचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणाचा तिघांना १६ लाखांचा गंडा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

