Share

उस्मानाबादेत ‘माझी पोषण परसबाग’ मोहिमेला सुरुवात

Published On: 

उस्मानाबाद: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कुटुंबांच्या आरोग्य व पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी ‘माझी पोषण परसबाग विकसन’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. १५ जून ते १५ जुलै २०२१ या कालावधीमध्ये उमेद सेंद्रिय पोषण परसबागा तयार केल्या जाणार असल्याचे उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर वसेकर यांनी सांगितले. जिल्ह्यात या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला असून उमेद अंतर्गत कार्यरत कर्मचारी व संसाधन व्यक्ती यांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले.

सेंद्रिय पोषण परसबाग निर्मितीचे तांत्रिक प्रशिक्षण उस्मानाबादचे जिल्हा कृती संगम समन्वयक गोरक्षनाथ भांगे यांनी या प्रशिक्षणाच्यावेळी दिले. या प्रशिक्षणात दहा हजार पेक्षा जास्त उमेद अभियानाचे कर्मचारी व समुदाय संसाधन व्यक्तींनी प्रशिक्षण घेतले. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये या सेंद्रिय पोषण परसबाग विकसन मोहिमेसाठी सात हजार कुटुंबांमध्ये पोषण परसबाग तयार करण्यात येणार असल्याचे जिल्हा अभियान व्यवस्थापक डॉ. बलवीर मुंडे यांनी सांगितले.

यासाठी जिल्हाभरातील सर्व उमेद स्टाफ व संसाधन व्यक्ती यांचे प्रशिक्षण झाले असून गाव पातळीवर कार्यरत १४०० संसाधन व्यक्तींच्या माध्यमातून ७००० सेंद्रिय पध्दतीने पोषण परस बागांची निर्मिती उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये केली जाणार आहे. या पोषण परसबागांच्या माध्यमातून प्रति कुटुंबाचा रसायनमुक्त भाजीपाला वरील वार्षिक सरासरी सहा ते आठ हजार रुपये बचत होणार असून या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील सात हजार कुटुंबांमध्ये कमीत कमी ४ कोटी २० लाख रुपयाची वार्षिक बचत होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड व प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!