मुंबई: कोरोनाच्या या संकट काळामध्ये सर्व सामान्य माणसाना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातच पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जातआहे. मात्र असे असताना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मोदी सरकारने पाम तेलासह विविध खाद्यतेलावरील आयात शुल्कात प्रती टन ८००० रुपयांची कपात केली आहे.
भारताकडून ७० % खाद्यतेल आयात केले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या वाढलेल्या किंमतीचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर होतो. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने शुल्क कपातीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार क्रूड पाम तेलाचे आयात शुल्क प्रती टनामागे ८६ डॉलर्सनी कमी करण्यात आले आहे.
तसेच क्रूड सोयाबीन तेलाच्या आयात शुल्कात सरकारने प्रती टन ३७ डॉलरची कपात केली असून, पाम तेलावरील आयात शुल्क प्रती टनामागे ११२ डॉलर्सने घट करण्यात आली आहे. केंद्र सरकारने तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करुन खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आणले जातील, असे आश्वासन दिले होते.
सध्या सर्वसामान्य माणूस या महागाईच्या आगीत होरपळून निघत आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती समजून घेतल्या पण आता अत्यावश्यक अशा गॅस व खाद्यतेलाच्याही किंमती वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. अशातच आता या निर्णयामुळे सामान्य माणसाला थोडा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबादेत राष्ट्रवादीला आले उधाण; तीन मोठे नेते दौऱ्यावर
- पहा नेमकं कोण आहेत? सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे कपल
- ‘…तरी न्यूझीलंड संघाला हलक्यात घेऊ नका’ ; दिग्गज फलंदाजाचा भारतीय संघाला सल्ला
- ‘भारतात येताना WTC ट्रॉफी घेऊनच ये’ ; हरभजन सिंगने दिल्या खास शुभेच्छा!
- अजित पवार उस्मानाबाद दौऱ्यावर; माजी आमदार मोटेंची घेणार भेट


