उस्मानाबाद: कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता आणि त्यात तुळजाभवानी मंदिरही भाविकांसाठी बंद करण्यात आले. तुळजापूर येथे हजारो व्यापारी या मंदिरावर अवलंबून आहेत त्यामुळे मंदिर बंद असल्याने या व्यापऱ्यांना आर्थक अडचणींना सामोरे जावे लागत आगे. मात्र आता कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. मात्र मंदिर उघडण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे तत्काळ मंदिर उघडण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा आत्महत्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा तुळजापूर शहरातील व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, तिर्थक्षेत्र तुळजापुरची आर्थिक उलाढाल ही ९०टक्के मंदिर व भाविकांवरच अवलंबून आहे. भाविक दर्शनासाठी आले तरच व्यापाऱ्यांची आर्थिक उलाढाल होते. तुळजापूर तालुक्यात कुठलीही औद्योगिक वसाहात नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगाराचा हाताला काम नाही. श्रीतुळजाभवानी मंदिरामुळे शहरासह तालुक्यातील २५ ते ३० हजार तरूण विविध कामे करून कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवत आहेत. मात्र कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे.
तसेच सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असून सर्व व्यवहार पुन्हा पूर्वपदावर येत आहेत. अत्यावश्यकसह सर्व दुकाने, सार्वजनिक व खासगी वाहतूक सेवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र श्री तुळजाभवानी मंदिर अद्यापही भाविकांसाठी उघडण्यात आलेले नाही. त्यामुळे व्यापारीच येत नसल्याने बांगड्या, महाप्रसादसह विविध दुकानातील साहित्याची विक्रीही होत नाही. व्यापारी प्रचंड आर्थिक संकटात सापडले असून तातडीने भाविकांसाठी मंदिर उघडण्यात यावे, अन्यथा व्यापारी वर्गावर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर संजय बोंदर यांच्यासह व्यापाऱ्यांची स्वाक्षरी घेण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुण्याच्या महापौरांचा जलवा, ‘ग्लोबल मेयर्स’च्या अंतिम फेरीत धडक; जगातील 631 महापौरांमधून निवड !
- कुठे आणि कधी पाहता येणार WTC चा अंतिम सामना ?, वाचा सविस्तर
- नताशा, देवांगना, आसिफला मिळालेला जमीन सरकारच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा
- कल्पक उपक्रमासाठी सीईओ डॉ. गोंदावले यांचा शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीने सत्कार
- उस्मानाबादेत राष्ट्रवादीला आले उधाण; तीन मोठे नेते दौऱ्यावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

