पुणे : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. वाझे यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर सचिन वाझेंकडून या प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन नाकारला यामुळे सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना आता अटक करण्यात आली आहे. काल रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे.
एनआयएच्या विशेष न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता सचिन वाझे यांची कसून चौकशी करण्याचा राष्ट्रीय तपासयंत्रणेचा (NIA) मार्ग मोकळा झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपने महाविकास आघाडीला विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलेच धारेवर धरले असल्याचे चित्र दिसत आहे. ‘सचिन वाझेंना कुणाचा पाठिंबा ते समोर आलं पाहिजे’, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज म्हणाले आहेत. यामुळेच फडणवीसांचा हा इशारा कोणाकडे आहे? अशी चर्चा सध्या राजकीय वातावरणात रंगत आहे.
कोरोनाचं कारण देत ठाकरे सरकारनं सचिन वाझेंना फक्त कामावरच घेतलं नाही तर क्राईम ब्रांचमध्ये घेतलं. मुंबईतील प्रत्येक केस त्यांच्याकडे जाईल अशी व्यवस्थाही केली. मग सरकारने दाखवलेला या विश्वासाच्या जोरावर आपण काहीही करु शकत, असं वाझेंना वाटत होतं. सचिन वाझेंवर सरकारचा एवढा विश्वास का होता? त्यातूनच त्यांना गंभीर गुन्हे करण्याचं बळ मिळालं, अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राजभवन हे भाजपभवन झालंय; नाना पटोलेंचा घणाघात
- रुग्णवाहिकेला वाट करून देण्यासाठी खासदार इम्तियाज जलील उतरले रस्त्यावर, ठाकरे सरकारवर टीका
- वाझेंना पोलीस दलात घेण्याचा शिवसेनेने माझ्याकडे आग्रह धरला होता पण…
- नांदेडमध्ये पहिल्या दिवशी लॉकडाऊनचे व्यापाऱ्यांकडून काटेकोर पालन
- जर पोलीसच गंभीर गुन्ह्यात सहभागी असतील तर कायदा-सुव्यवस्था राहील का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

