लातूर: सध्या सर्वत्र कोरोना महामारीचे मोठे संकट थैमान घालत आहे. कोरोना बाधितांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा देखील अपुरी पडत असल्याने रुग्णांचे तसेच त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांचे देखील हाल होत आहेत. अशा संकट काळात नागरिकांनी सहकार्य करण्याची मोठी जबाबदारी नागरिकांवर असते आणि ती सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची मोठी भूमिका असते. महाराष्ट्र दिनानिमित्त लातूर पोलीस दलात दुचाकी व चारचाकी वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
संकट काळात सामान्य नागरिक घरात सुरक्षित राहावा तसेच कोणतेही संकट आले त्यात ठामपणे उभे राहणारे असतात पोलीस. पोलीस आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत याची जाणीव प्रत्येक नागरिकाला असणे गरजेचे आहे. कोरोनाच्या काळात देखील आपले कर्तव्य बजावत कोरोनाशी रोज दोन हात करत आहेत. मात्र नागरिक नियमांचे उल्लंघन करत पोलिसांना आणखी त्रास देत असतात. महाराष्ट्र दिनानिमित्त लातूर मध्ये पोलिस दलाला २८ चारचाकी व ५१ दुचाकी देण्यात आल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते या गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला तसेच या वेळी ध्वजारोहण देखील करण्यात आले.
कोरोनाच्या भीषण परिस्थितीमुळे राज्यभरात महाराष्ट्र दिन अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांची वाढ होत असली तरी आता त्यातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना रुग्णांची संख्या जी चार अंकी होती ती आता तीन अंकी आकड्यावर आली आहे, असेच हळू-हळू कोरोनावर मात करत लवकरच हा आकडा दोन अंकी होईल अशी अपेक्षा अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन देखील या वेळी करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- ‘..मग इतक्या दिवस तुम्ही काय केले?’, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- ऐन कोरोनाच्या काळात मनपातून तज्ज्ञ अधिकारी सेवानिवृत्त!
- ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाषण म्हणजे भुलभुलय्या’, भाजपचा टोला
- औषधी करमुक्त करण्याची मागणी
- उदगीरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी साधला कोविड रुग्णांशी संवाद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

