Share

ऐन कोरोनाच्या काळात मनपातून तज्ज्ञ अधिकारी सेवानिवृत्त!

Published On: 

औरंगाबाद : महापालिकेतून अनेक अनुभवी अधिकारी सध्या सेवानिवृत्त झाले आहेत अनेक सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहेत. त्याचा परिणाम कोरोनामुळे निर्माण झालेल्या प्रशासकीय कामकाजावर होत आहे. यातच शुक्रवारी (दि.३०) आणखी तीन तज्ज्ञ अधिकारी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे व उपअभियंता बी.डी. घुले हे सेवानिवृत्त झाले. तसेच फारोळा येथे इलेक्ट्रीशियनची जबाबदारी सांभाळणारे आनंदा मल्हारे देखील शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. यामुळे लवकरात लवकर औरंगाबाद मनपात कुशल अधिकारी वर्गाची भरती होणे आवश्यक आहे.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आयुक्तांनी आपले विचार मांडतांना सांगितले, कोणत्याही खात्यात प्रदीर्घ काळ नोकरी करत असतांना कर्तव्यनिष्ठ आणि परिश्रम पूर्वक चांगले काम करून आपले आयुष्य घातले, अशा अधिकाऱ्यांनी आपल्या ज्ञानाचा फायदा आपल्या सहकाऱ्यांना व इतरांनाही करून द्यावा , असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी यावेळी केले.

पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील तज्ज्ञ अधिकारी म्हणून या अधिकाऱ्यांची ओळख आहे. वर्षभरापूर्वीच कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती मिळालेले हेमंत कोल्हे यांनी पालिकेत ३८ वर्षे सेवा दिली. १५ मार्च १९८३ साली ते पालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले होते. त्यांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात २२ वर्षे सेवा दिली.

दुसरीकडे बी.डी. घुले यांनी पालिकेत २७ वर्ष सेवा देतांना जायकवाडी, फारोळा व नक्षत्रवाडी येथील वीजपुरवठा सुरळीत ठेवताना यांत्रिकी विभागाची जबाबदारी पार पाडली. या दोन अधिकार्यांबरोबरच पाणीपुरवठा विभागात फारोळा येथे इलेक्ट्रीशिनची जबाबदारी सांभाळणारे आनंदा मल्हारे देखील शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. या तीन अधिकार्‍यांच्या निवृत्तीमुळे तज्ज्ञ अधिकार्यांची कमतरता आता पालिकेला भासणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!