Share

उदगीरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी साधला कोविड रुग्णांशी संवाद

Published On: 

लातूर: कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी देखील त्यातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. उदगीर तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उदगीरात अनेक कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. शुक्रवारी (दि.३०) जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी उदगीर मधील सर्व कोरोना उपचार केंद्रावर प्रत्यक्ष भेट देत उपचारासाठी दाखल असलेल्या कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीविषयी आस्थेवाईकपणे चौकशी करत, मिळणाऱ्या सुविधा बाबत विचारणा करून अडी अडचणी जाणून घेतल्या.

उदगीरात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत. शहरातील सहा ठिकाणी शासकीय कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. शिवाय शासकीय नियमाप्रमाणे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील नऊ खाजगी दवाखान्यांना प्रशासनाने परवानगी दिलेली आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी उदगीर मध्ये आलेले होते.

यावेळी त्यांनी शासकीय सामान्य रुग्णालयातील कोविड हॉस्पिटल, लॉयन्स जवळील येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, तोंडार पाटी येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व कोविड केअर सेंटर येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी कोरोना बाधित रुग्णांशी त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करून त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा या बाबत चौकशी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!