औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात मोठी आपत्ती आली आहे. सामान्य नागरिकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यात कोरोनावरील उपचारासाठी करावा लागणारा खर्च आवाक्याबाहेर झाला असून त्यामुळे सर्व औषधी करमुक्त करण्याची मागणी सिल्लोड तालुक्यातील मंगरूचे सरपंच निवृत्ती वर्पे यांनी तहसिलदाराकडे केली आहे.
या निवेदनाचीप्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर यांनाही पाठवण्यात आली आहे. टाळेबंदी संचारबंदीमुळे सामान्य नागरिकाचे जीवन असह्य झाले आहे. कुटूंबासह सर्वांना जगण्यासाठी मोठया अर्थिक समस्याचा सामना करावा लागत असून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वैद्यकीय उपचाराचा लाखो रुपयाचा आर्थिक खर्चाचा बोजा पडत आहे.
अशा कठीण परिस्थतीत राज्य सरकारने सर्व ओषधी करमुक्त करावीत अशी मागणी करण्यात आली आहे. चित्रपट करमुक्त केले जात असतील तर याच धर्तीवर माणसे जिवंत ठेवण्यासाठी औषधी करमुक्त करा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझ्या कारकीर्दीत मी नेहमीच असा कारनामा करण्याचा प्रयत्न केला पण…’ सेहवाग कडून पृथ्वी शॉचं कौतुक
- ‘महाविकास आघाडीची शेतकऱ्यांच्या बांधावर बि – बियाणे योजना हवेत विरली’
- ‘बचपन के बिछडे आयपीएलमे मिले’ अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी होत्या ‘स्कूलमेट’
- एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही-पटोले
- मोठी बातमी : भारतातून ‘या’ देशात गेल्यास 5 वर्षांचा कारावास

