Share

संगीताच्या माध्यमातून लता दीदी सदैव आपल्यासोबत; डॉ. भागवत कराडांनी व्यक्त केल्या भावना!

Published On: 

औरंगाबाद: संगीत विश्वातील देशाची शान, गाणकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर(Late Mangeshkar) यांचे निधन अत्यंत दु:खद आहे. लता दीदींनी आपल्या आवाजाने संगीत विश्व गाजवले आहे. संगीताच्या माध्यमातून लता दीदी सदैव आपल्यासोबत असतील. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. ओम शांती. अशा शब्दांमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड(Dr. Bhagwat Karad) यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आज सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आपल्या करोडो चाहत्यांना पोरके करून दीदी निघून गेल्या आहेत. लता दीदींच्या जाण्याने संपूर्ण भारतावर शोककळा पसरली असून पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या २७ दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. आपल्या सुमधुर आवाजाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या लता मंगेशकर यांनी अनेक अजरामर गीते गायली आहेत. लता दीदींच्या जाण्याने संपूर्ण भारतावर शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता.

त्यातच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. यामुळेच त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असतांनाच आज त्यांची प्रकृती प्रचंड खालावली. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. लता मंगेशकर यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह देशातील दिग्गज नेत्यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत. ‘दयाळू आणि काळजी करणाऱ्या लतादीदी आपल्याला सोडून गेल्या. त्यामुळे देशात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. ती न भरून निघणारी आहे. भारतीय संस्कृतीच्या एक दिग्गज म्हणून येणाऱ्या पिढ्या त्यांना लक्षात ठेवतील. त्यांच्या सुरेल आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची क्षमता होती,’ अशा शब्दांत मोदींनी लतादीदींना आदरांजली वाहिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!