उस्मानाबाद: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यात अगोदरच उस्मानाबादमध्ये चांगले उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी असताना त्यात कोरोना काळात सुविधांचा तुटवडा, रेमडेसिविरसारख्या औषधांची अनुपलब्धता, मृत्यूंचे प्रमाण वाढल्यामुळे निर्माण झालेली पराकोटीची नकारात्मकता यामुळे जिल्ह्यातील २५ टक्क्यांपेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण अन्य जिल्ह्यात उपचारासाठी जात आहेत. काहीजणांनी अन्य राज्याचीही उपचारासाठी वाट पकडली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठा कहरच जिल्ह्यात निर्माण झाला आहे. मध्यंतरी रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. विविध सुविधांची वानवा, सातत्याने प्रयत्न करूनही उपलब्ध न होणारे बेड आदी कारणांमुळे जिल्ह्यात पराकोटीची नकारात्मकता निर्माण झाली आहे. अशात मोठ्या प्रमाणात मृत्यूंचीही संख्या वाढली आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा रुग्णालयात व खासगी रुग्णालयात बेड मिळत नसल्यामुळे उस्मानाबाद उपचार मिळणे अशक्य असल्याची मानसिकता तयार होत आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी अन्य जिल्ह्यात जात आहेत. सद्यस्थितीत २५ टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण जिल्ह्याच्या बाहेर उपचारासाठी गेलेले आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर समजल्यावर एकतर सोलापूरला बेडची विचारणा होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- वऱ्हाड निघालंय पोलीस स्टेशनला! हळदीला गर्दी झाल्याने महिला सरपंचावर गुन्हा
- राज्य सरकारने आकडेवारीची लपवाछपवी करू नये-फडणवीस
- ‘युपी, गुजरातपेक्षा महाराष्ट्रात परिस्थिती चांगली’, मेधा पाटकर यांची प्रतिक्रिया
- ‘सभा, कमी लसीकरणामुळे भारतात परिस्थिती बिघडली’, डब्ल्यूएचओने सुनावले
- पोलिसांच्या चकमकीत दोन कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

